मुंबई : इंडियन प्रीमिअर लीगच्या व्यग्र वेळापत्रकानंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतीय संघातील बरेच खेळाडू पर्यटनासाठी गेलेले आहेत. याची माहिती ते सोशल मीडियावरून देत आहेत. कोहलीनंही त्याच्या सुट्टीवरील एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आणि त्यावरुन भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅप्टनची फिरकी घेतली.
कोहलीनं फोटो पोस्ट करून आपण कोणत्या शहरात आहोत, असा प्रश्न विचरला. त्यावरून युवीनं कोहलीला ट्रोल केलं. हे कोटकापूरा तर नाही ना? हरभजन सिंग तुला काय वाटतं? असा प्रतीसवाल युवीनं केला. कोटकापूरा हे पंजाबमधील एक शहर आहे.