Join us
Daily Top 2Weekly Top 5

युवराज सिंगनं घेतली शोएब अख्तरची फिरकी; म्हणाला...

अॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला जायबंद केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 19:53 IST

Open in App

लंडन : अॅशेस कसोटी मालिकेच्या दुसऱ्या कसोटीत पदार्पण करणाऱ्या इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला जायबंद केले. जोफ्रानं टाकलेला बाऊंसरवर स्मिथला दुखापत झाली आणि त्याला कसोटीतून माघार घ्यावी लागली. शिवाय स्मिथच्या तिसऱ्या कसोटीतही खेळण्याची शक्यताही फार कमी आहे. त्यामुळे फलंदाजांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात आहे. पाकिस्तानचा माजी गोलंदाज शोएब अख्तरने आर्चरवर टीका केली. स्मिथ वेदनेने कळवळत असताना आर्चरने त्याची विचारपूसही केली नाही, त्यावरून अख्तरने आर्चरचे कान टोचले. 

आर्चरने ट्विट केले की,''बाऊंसर हा या खेळातील भागच आहे. पण, जेव्हा आपल्या गोलंदाजीवर फलंदाज जखमी होतो, तेव्हा त्याची विचारपूस करण्याचा मोठेपणा त्या गोलंदाजाने दाखवायचा असतो. पण, आर्चरने तसे केले नाही. स्मिथ वेदनेनं कळवळत असताना आर्चर तेथून निघून गेला. माझ्या गोलंदाजीवर असे घडत होते, तेव्हा मी त्वरीत फलंदाजाकडे धाव घ्यायचो आणि विचारपूस करायचो.''  शोएबच्या या ट्विटनंतर भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगने चांगलीच फिरकी घेतली. त्यानं लिहिले की,''हो तू धावत फलंदाजाकडे यायचास, परंतु तू तेव्हा विचारपूस करण्यापेक्षा अजून असे बाऊंसर येतील असेच सांगायचास.'' स्टीव्हन स्मिथला बॉल लागल्यावर आता ऑस्ट्रेलिया घेणार मोठा निर्णयअ‍ॅशेस मालिकेतील दुसरा सामना हा लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळवला गेला. या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 148.7 ताशी प्रति कि.मी. या वेगाने बाऊन्स टाकला. हा बाऊन्सर स्मिथच्या मानेला लागला. हा चेंडू एवढ्या जोरात स्मिथला लागला की, त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर दुसऱ्या डावात तो फलंदाजीला आलाच नाही. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने आता एक निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांच्या सुरक्षेसाठी आता क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मानेपर्यंत असलेले हेल्मेट वापरण्याचा विचार करत आहे. त्यामुळे आता ऑस्ट्रेलियाचे खेळाडू नवीन हेल्मेटसह खेळताना दिसतील. त्यामुळे आता हे हेल्मेट कसे असेल, याची उत्सुकता चाहत्यांना आहे. 

टॅग्स :युवराज सिंगशोएब अख्तरस्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019