पंजाबी गाणं अन् बायकोसोबतच्या आठवणींचा 'खजिना'; ...अन् पुन्हा हेजलच्या प्रेमात बुडाला युवी!

सिक्सर किंग युवीनं बायकोसाठी शेअर केलेल्या प्रेमळ पोस्टची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 14:04 IST2025-02-28T13:48:17+5:302025-02-28T14:04:16+5:30

whatsapp join usJoin us
Yuvraj Singh Share Special Instagram Post For Wife Hazel Keech Birthday | पंजाबी गाणं अन् बायकोसोबतच्या आठवणींचा 'खजिना'; ...अन् पुन्हा हेजलच्या प्रेमात बुडाला युवी!

पंजाबी गाणं अन् बायकोसोबतच्या आठवणींचा 'खजिना'; ...अन् पुन्हा हेजलच्या प्रेमात बुडाला युवी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Yuvraj Singh Special Instagram Post For Wife Hazel Keech : क्रिकेट जगतात सिक्सर किंग या नावाने ओळखला जाणारा भारताचा माजी चॅम्पियन अष्टपैलू युवराज सिंग हा सोशल मीडियावर चर्चेत असतो. क्रिकेटच्या मैदानातील कामगिरीशिवाय युवराज सिंग  हा फिल्डबाहेरील प्रेमाच्या गोष्टीमुळेही चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले. युवराज सिंगसोबत अनेक अभिनेत्रींची नावे जोडली गेली. पण लग्नासाठी त्याने पसंती दिली ती हेजल किचला. दोघांची लव्ह स्टोरी एकदम खास अन् झक्कास आहे. पुन्हा एकदा दोघांच्यातील प्रेमाचा झरा ओसंडून वाहताना दिसला. त्याच कारणही तितकेच खास आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

युवीनं बायको हेजलवर केली प्रेमाची 'बरसात', कारणही तितकेच खास

भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंग याने सोशल मीडियाच्या माध्यमातून बायकोसाठी खास पोस्ट शेअर केलीये. व्हिडिओ पोस्टच्या माध्यमातून युवीनं हेजलसोबतच्या जुन्या आठवणींचा 'खजाना'च बाहेर काढलाय. यामागचं कारण आहे हेजल किच हिचा बर्थडे. युवराज सिंगची पत्नी आणि अभिनेत्री अशी ओळख असलेली हेजल किच आपला ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. तिच्या बर्थडे दिवशी युवराज सिंग याने तिच्यासोबतचे खास फोटो शेअर करत प्रेमळ अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. 

पंजाबी गाणं, बायकोसोबतच्या आठवणी अन्...


युवराज सिंगनं जी पोस्ट शेअर केलीये त्या व्हिडिओ फोटो स्टोरीमध्ये पंजाबी गाणं अन् हेजलसोबतचे त्याचे खास फोटो दिसून येतात. दोघांच्यातील कमालीची केमिस्ट्री अन् बॉन्डिंग दाखवणाऱ्या पोस्टमधील कॅप्शनही एकदम खास आहे. हेजलवरील प्रेम व्यक्त करताना युवराजनं लिहिलंय की, "हॅप्पी बर्थडे हेजी. आपलं घर अन् कुटुंब एकत्रित ठेवण्याची जबाबदारी तू अगदी अविश्वसनीयरित्या पार पाडते. तुझ्या मातृत्व सुखाचा क्षण माझ्यासाठी आणखी आनंदीक्षण देणारा होता. येणारं वर्षही तुझ्यासाठी सर्वोत्तम असेल. लव्ह यू"  अशा आशयाच्या शब्दांत युवीनं बायकोवरील प्रेम व्यक्त करताना तिचं आपल्या आयुष्यातील स्थान अधोरेखित केल्याचे  दिसून येते. 

हेजलचं खर नाव अन् लग्नानंतरचं नाव माहितीये का?

हेजल किच हिचा जन्म २८ फेब्रुवारी १९८७ मध्ये इंग्लंडमध्ये झाला. हेजलचे वडील ब्रिटीश नागरिक तर आई भारतीय वंशाची. तिच मूळ नाव हेजल असं नाही तर रोज डॉन असं आहे. पण मॉडेलिंग आणि चित्रपटात काम करताना तिला हेजल किच या नावाने ओळख मिळाली. युवीसोबत लग्न केल्यावरही तिच्या नावात बदल झाला. लग्नानंतरचे  तिचे नाव गुरबसंत कौर असं आहे. ही गोष्ट फारच कमी लोकांना माहिती असेल.

Web Title: Yuvraj Singh Share Special Instagram Post For Wife Hazel Keech Birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.