Join us  

Sania Mirza : ऊ अंटावा...! सानिया मिर्झाच्या पार्टीत फराह खानसोबत युवी आणि इरफानने धरला ठेका

sania mirza farewell: भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या कारकिर्दीतील निरोपाचा सामना खेळला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 5:27 PM

Open in App

Farah Khan dance with yuvraj singh and irfan pathan । नवी दिल्ली : भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने रविवारी आपल्या कारकिर्दीतील निरोपाचा सामना खेळला. 5 मार्च 2023 रोजी सहा वेळा ग्रँडस्लॅम विजेती सानिया मिर्झा हैदराबादच्या लाल बहादूर टेनिस स्टेडियममध्ये अखेरचा सामना खेळताना भावूक झाली. सानियाने काल रात्री एक फेअरवेल पार्टी आयोजित केली होती, ज्यात महेश बाबू, एआर रहमान, नम्रता शिरोडकर, नेहा धुपिया, हुमा कुरेशी, फराह खान, युवराज सिंग, इरफान पठाण, सायना नेहवाल आणि यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. 

दुसर्‍या एका कार्यक्रमात, अभिनेत्री फराह खानने सानिया मिर्झा, युवराज सिंग, इरफान पठाण आणि सायनाला पुष्पा या चित्रपटातील गाण्यावर डान्स करायला लावला. सानियाच्या जवळच्या सहकाऱ्यांनी 'ऊ अंटावा' गाण्यावर ठेका धरल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. निवृत्तीनंतर सानियासोबत मस्ती करतानाचा फोटोही फराह खानने पोस्ट केला आहे.  

युवी, इरफानने धरला ठेका 

सानिया मिर्झा, युवराज सिंग, इरफान पठाण, सायना नेहवाल यांनी फराह खानसोबत जबरदस्त डान्स केला. सायना नेहवालने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सानिया मिर्झाच्या फेअरवेल पार्टीचा एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये फराह खान सायना मिर्झा, युवराज सिंग, इरफान पठाण आणि सायनासोबत स्टेजवर दिसत आहे. फराह त्यांना 'ऊ अंटावा'च्या डान्स मूव्ह्स शिकवताना दिसत आहे. 

फराह खानने शेअर केला खास फोटोसानिया मिर्झाच्या निवृत्तीनंतर तिची जिवलग मैत्रिण फराह खानने एक खास फोटो शेअर केला आहे. फराह खानने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती आणि सानिया मिर्झा बेडवर हात धरून झोपलेल्या दिसत आहेत. फराहने लिहिले, "निवृत्तीनंतर चॅम्पियन्स हेच करतात.. तुमच्या जिवलग मित्रासोबत अंथरुणावर विश्रांती घ्या#saniaevent @mirzasaniar lov uuu." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :सानिया मिर्झायुवराज सिंगफराह खानइरफान पठाणसायना नेहवाल
Open in App