Join us

Funny : युवराज सिंगला 'या' कार्टून कॅरेक्टरसारखा दिसतो ख्रिस गेल

युवराज सिंग आणि ख्रिस गेल, हे दोघेही स्फोटक फलंदाज एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 15:59 IST

Open in App

मुंबई : युवराज सिंग आणि ख्रिस गेल, हे दोघेही स्फोटक फलंदाज एकमेकांचे चांगले मित्र आहेत. या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांच्या खेळीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरलीच पाहिजे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये हे दोन्ही खेळाडू किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसले होते. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से तेव्हाही ऐकायला मिळाले होते. तसाच एक किस्सा शनिवारी घडला. युवराज सिंगने वेस्ट इंडिजच्या या फलंदाजाला एका कार्टून पात्राचे नाव दिले. त्यावर गेलनेही त्वरित रिप्लाय दिला. 

हॉलीवूडमधील एका चित्रपटातील पात्र युवराजला गेलसारखे वाटले. त्याने त्वरित त्या पात्राच्या प्रतिकृतीसोबत फोटो काढले आणि इंस्टाग्रामवर तो अपलोड करून गेलला सवाल केला. युवी म्हणाला,'' काका, तु मुंबईत काय करत आहेस? मला वाटले तु दुबईत आहेस.'' गेल सध्या अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये बल्ख लीजंड्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. युवराजच्या या मस्करीवर गेलनेही प्रत्युत्तर दिले.   अफगाणिस्तान प्रीमिअर लीगमध्ये गेल तुफान फटकेबाजी करत आहे. त्याने तीन सामन्यांत 53, 73 व 80 धावांची वादळी खेळी केल्या आहेत. 

टॅग्स :युवराज सिंग