Join us

युवराज सिंगचं चॅलेंज धवनने स्वीकारलं; तेंडुलकर, गेल, लारा काय करणार?

सध्या सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2019 09:42 IST

Open in App

मुंबई : सध्या सोशल मीडियावर #bottlecapchallenge चा धुमाकूळ सुरू आहे. बॉलिवूड, हॉलिवूड सेलिब्रेटींपासून मराठी चित्रपट क्षेत्रातील दिग्गज कलाकारही या चॅलेंजमध्ये सहभाग घेताना दिसत आहेत. अशाच खेळाडू मागे राहिले तर कसे होईल. प्रो कबड्डीतील स्टार रोहित कुमार, फजल अत्राची आणि रिषांक देवाडिगा यांनीही हे चॅलेंज स्वीकारले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणाऱ्या युवराज सिंगनेही हे चॅलेंज स्वीकारले, परंतु त्यानं त्यात ट्विस्ट आणला आहे. या चॅलेंजमध्ये किकमारून समोरील बॉटलचे झाकण उघडण्याचा टास्क आहे, परंतु युवीनं क्रिकेटच्या स्टाईलमध्येच यात नवीन ट्विस्ट आणला आहे. त्यानं हे चॅलेंज स्वतः पूर्ण केले आणि त्यानंतर महान फलंदाज सचिन तेंडुलकर, ब्रायन लारा यांच्यासह ख्रिस गेल व शिखर धवन यांनाही आव्हान दिले. युवीनं नेमकं काय केलं ते पाहा...युवीचं हे चॅलेंज शिखर धवनने स्वीकारले आहे, त्यामुळे तेंडुलकर, लारा, गेल यांच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. युवराजच्या चाहत्यांसाठी खूशखबर; कॅनडानंतर आणखी एका लीगमध्ये करणार फटकेबाजी!भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कॅनडा येथे होणाऱ्या ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार असल्याचे नुकतेच जाहीर केले. भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता नसल्यामुळे युवीनं आंतरराष्ट्रीय आणि इंडियन प्रीमिअर लीगमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला. मुळात त्याला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून परदेशी लीगमध्ये खेळण्याची परवानगी हवी होती आणि त्यासाठीच त्यानं निवृत्ती पत्करली. आता ग्लोबल ट्वेंटी-20 लीगनंतर युवी युरो ट्वेंटी-20 लीगमध्येही खेळणार असल्याचे समजत आहे. ही लीग आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथे 30 ऑगस्ट व 22 सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार आहे.

युरो ट्वेंटी-20 स्लॅमच्या सल्लागार समितीचे सदस्य आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू डीन जोन्स यांनी या लीगमध्ये भारताचे आणखी काही खेळाडू सहभाग घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. ''बीसीसीआयच्या नियमानुसार भारतीय खेळाडूंना परदेशी लीगमध्ये खेळता येत नव्हतं. त्यामुळे काही भारतीय खेळाडूंना निवृत्ती जाहीर केली. युवराज सिंग हा त्यातलाच एक खेळाडू आहे आणि युरो ट्वेंटी-20 स्लॅममध्ये खेळण्याची त्यानं इच्छा व्यक्त केली आहे.''

युवराज व्यतिरिक्त पंजाबचा मनप्रीत गोनीही ग्लोबल ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळणार आहे. युवीनं युरो ट्वेंटी-20 लीगमध्ये खेळण्याचे निश्चित केल्यास एबी डिव्हिलियर्स, आंद्रे रसेल, डेल स्टेन आणि इम्रान ताहीर यांच्या पंक्तित बसेल. स्टेन व रसेल यांना दुखापतीमुळे वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पण, ते युरो ट्वेंटी-20 स्लॅमपूर्वी तंदुरूस्त होतील अशा विश्वास जोन्स यांनी व्यक्त केला.

या लीगमध्ये ऑस्ट्रेलियाचा शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम, अफगाणिस्तानचा रशीद खान आणि पाकिस्तानचा शाहीद आफ्रिदीही खेळणार आहे. शिवाय ख्रिस लीन, बाबर आजम, ल्युक राँची, जेपी ड्यूमिनी यांचाही सहभाग असल्याची घोषणा लवकरच करण्यात येईल. आयर्लंड, स्कॉटलंड आणि नेदरलँड्स येथील प्रत्येकी दोन संघ या लीगमध्ये खेळणार आहेत.

कबड्डीतही बॉटलकॅपचॅलेंजची क्रेझ

टॅग्स :युवराज सिंगशिखर धवनसचिन तेंडुलकरप्रो-कबड्डीख्रिस गेल