Join us

युवराजला शानदार निरोप द्यायला हवा होता- रोहित

तुम्हाला एखाद्या गोष्टीचे महत्व तेंव्हाच पटते जेंव्हा ती तुमच्याजवळ नसते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 07:15 IST

Open in App

नॉटिंगहॅम: भारतीय संघातील सलामीचा फलंदाज रोहित शर्मा याने युवराज सिंग याच्या कारकिर्दीचे कौतुक केले. त्याच बरोबर युवराजला शानदार पद्धतीने निरोप द्यायला हवा होता असे मत व्यक्त केले.

रोहित म्हणाला,‘ तुम्हाला एखाद्या गोष्टीचे महत्व तेंव्हाच पटते जेंव्हा ती तुमच्याजवळ नसते. युवराज तुम्ही यापेक्षा चांगल्या निवृत्तीचे हकदार होता.’ युवराज सिंगने सोमवारी आंतरराष्टÑीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. यावेळी त्याने खुलासा केला की, बीसीसीआयने त्याला यो यो टेस्ट मध्ये अपयशी ठरल्यास निवृत्तीचा प्रस्ताव दिला होता. मात्र, युवराजने यो यो टेस्ट यशस्वी पार केली. मात्र त्याला निरोपाचा सामना खेळण्यास मिळाला नाही.

युवराजसह त्याचे सहकारी असलेल्या विरेंद्र सेहवाग, व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, गौतम गंभीर, राहुल द्रविड या दिग्गज खेळाडूंनाही आंतरराष्टÑीय सामन्याद्वारे निवृत्ती घेण्याची संधी मिळालीनाही. 

टॅग्स :रोहित शर्मायुवराज सिंग