नवी दिल्ली : ‘आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक माझ्या कारकीर्दीला वळण देणारा ठरला,’ असे मत भारताचा कर्णधार विराट कोहली याने व्यक्त केले. २००८ चा विश्वचषक भारताने विराटच्याच नेतृत्वात जिंकला, हे विशेष. कोहली म्हणाला,‘१९ वर्षांखालील विश्वचषकामुळे क्रिकेटमध्ये प्रगती साधण्यास वाव मिळाला.या जेतेपदाचे माझ्या हृदयात आणि डोक्यात विशेष स्थान आहे. या विश्वचषकात भारताचे वर्चस्व राहिले होते, पण न्यूझीलंडचा केन विलियम्सन हा या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू होता.’ कोहलीच्या नेतृत्वात भारताने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले होते. त्या स्पर्धेत रवींद्र जडेजा, ट्रेंट बोल्ट व टिम साऊदी होते.
२००८ साली कोहली स्टार म्हणून पुढे आला, तर २०१० च्या स्पर्धेत बेन स्टोक्स, जोस बटलर व ज्यो रूटसारखे खेळाडू पुढे आले. स्टोक्सने भारताविरुद्ध एका सामन्यात ८८ चेंडूत ६ षटकारांसह १०० धावा ठोकल्या होत्या. (वृत्तसंस्था)