Join us

आजपासून रंगणार युवा क्रिकेट विश्वचषकाचा थरार

भारतीय संघातील यशस्वी जैस्वाल, प्रियम, रवी बिश्नोई व कार्तिक त्यागी यांना यंदाच्या आयपीएल सत्रासाठी करारबद्ध झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2020 02:39 IST

Open in App

केपटाऊन : भारतीय युवा क्रिकेट संघ शुक्रवारपासून सुरु होत असलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपले जेतेपद कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल. त्याचवेळी टीम इंडियाचे यंदा विक्रमी पाचवे विश्वविजेतेपद पटकावण्याचेही लक्ष असेल. भारतीय संघात वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असून कर्णधार प्रियम गर्गसह एकूण सहा खेळाडू प्रथम श्रेणी, अ दर्जा व टी२० स्पर्धेत वरिष्ठ खेळाडूसोबत खेळले आहेत.

भारतीय संघातील यशस्वी जैस्वाल, प्रियम, रवी बिश्नोई व कार्तिक त्यागी यांना यंदाच्या आयपीएल सत्रासाठी करारबद्ध झाले आहेत. भारताने १९ वर्षांखालील क्रिकेटमध्ये २००८ सालापासून विराट कोहलीच्या नेतृत्त्वाखाली राखलेला दबदबा आतापर्यंत कायम राखला आहे. त्याचवेळी, स्पर्धेत सहभागी इतर देशांपैकी पाकिस्तान, आॅस्टेÑलिया, न्यूझीलंड या संघांमधूनही भविष्यातील स्टार खेळाडू समोर येतील.