Join us

धक्कादायक! क्रिकेटच्या मैदानातच झाला युवा खेळाडूचा मृत्यू

मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना एका क्रिकेटपटूला अचानक चक्कर आली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण त्याची तब्येत नाजूक असल्याचे समजले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 19:57 IST

Open in App

क्रिकेटच्या मैदानात काही खेळाडूंवर जीव गमावण्याची पाळी आली आहे. क्रिकेट आणि चाहत्यांसाठी ही सर्वात दुर्दैवी गोष्ट. पण आता तर क्रिकेटच्या मैदानात एका युवा खेळाडूचा मृत्यू झाल्याची वाईट घटना घडली आहे.

मैदानात क्रिकेटचा सामना खेळत असताना एका क्रिकेटपटूला अचानक चक्कर आली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी त्याच्याकडे धाव घेतली. पण त्याची तब्येत नाजूक असल्याचे समजले आणि त्याला थेट हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेतला.

या खेळाडूला मैदाना का चक्कर आली, या गोष्टीचे अजूनही निदान झालेले नाही. पण चक्कर आल्यावर सर्व खेळाडू त्याच्या जवळ धावले. संघाच्या डॉक्टरांनीही त्याच्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी काही प्रथमोपचार करायला सुरुवात केली. पण तो खेळाडू कोणत्याही गोष्टीला प्रतिसाद देत नव्हता.

खेळाडू मैदानात पडलेला असताना तो डॉक्टरांच्या उपचाराला प्रतिसाद देत नव्हता. त्यावेळी त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण हॉस्पिटलला पोहोचण्यापूर्वीच त्या युवा क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पण अजून त्याचे शवविच्छेदनाची प्रक्रीया करण्यात आलेली नाही.

ओदिशामधील सत्यजीत प्रधान या युवा खेळाडूच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे. तो केंद्रपाडा येथील देरावीश महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत होता. त्याचा मृत्यू हा हार्ट अॅटॅकने झाल्याचे म्हटले जात आहे. पण याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही.

टॅग्स :ओदिशा