Join us  

टीम इंडिया एकाच'वेळी' करणार दोन प्रतिस्पर्ध्यांचा सामना, जाणून तुम्हीही व्हाल थक्क

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा आणि निर्णायक सामना आज बंगळुरु येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 12:54 PM

Open in App

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातला तिसरा आणि निर्णायक सामना आज बंगळुरु येथे खेळवण्यात येणार आहे. अवघ्या अर्ध्यातासात हा सामना सुरु होणार आहे. भारतानं दुसरा वन डे सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. त्यामुळे रविवारी होणाऱ्या सामना हा दोन्ही संघांसाठी निर्णयाक आहे. पण, आज टीम इंडियाला एक नव्हे तर दोन प्रतिस्पर्धींशी सामना करावा लागणार आहे. आश्चर्य वाटलं ना... चला तर मग जाणून घेऊया नक्की काय गणित आहे ते...

राजकोटमध्ये भारताने ३६ धावांनी विजय मिळवून दमदार पुनरागमन केले. दुसऱ्या वनडेत भारताने फलंदाजी संयोजन सुधारले. लोकेश राहुल याने पाचव्या स्थानावर खेळून संधीचा लाभ घेतला. रोहित शर्मा- शिखर धवन यांनी डावाची शानदार सुरुवात केल्यानंतर विराट कोहलीने स्वत:च्या पसंतीच्या तिसºया स्थानावर शानदार कामगिरी केली. निर्णायक सामन्यात फलंदाजीचा हाच क्रम कायम राहणार आहे. पण, शिखर धवन आणि रोहित शर्मा यांना दुखापत झाल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे टीम इंडियाच्या चमूत चिंतेचं वातावरण आहे.

हा सामना वगळता टीम इंडिया आज वर्ल्ड कप जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. आज भारतीय संघ 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहे. भारतीय संघाने चार वेळा वर्ल्ड कप जिंकला आहे. 2000, 2008, 2012 आणि 2018मध्ये वर्ल्ड कप विजयाचा मान टीम इंडियानं पटकावला आहे. यावेळीही टीम इंडियाला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. 2018मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली आणि दी वॉल राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं जेतेपद पटकावले होते. यंदा प्रियम गर्गच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानावर उतरणार आहे. आज भारत श्रीलंकेशी मुकाबला करणार आहे. त्यामुळे आजच्या दिवशी टीम इंडिया दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन प्रतिस्पर्धींचा सामना करणार आहे.

आजपासून सुरू झालाय 19 वर्षांखालील वर्ल्ड कपचा महासंग्राम, जाणून घ्या टीम इंडियाचे वेळापत्रक

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ