ठळक मुद्देरमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन आणि अमरे यांनी क्रिकेटचे धडे गिरवले होते.
मुंबई : भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरच्या नावावर बरेच विश्वविक्रम आहेत. हे विश्वविक्रम अजूनही कुणाला मोडता आलेले नाही. पण तरीही सचिनचे पाय अजूनही जमिनीवर आहेत. कारण आपल्या आयुष्यातला प्रत्येक गोष्टींची जाणीव त्याला आहे. त्यामुळेच आपल्या एका मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिनने जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यावेळी तो भावनिकही झाला.
भारताचे माजी क्रिकेटपटू प्रवीण अमरे यांचा आज वाढदिवस आहे. सचिन आणि प्रवीण हे एकाच गुरुचे शिष्य आहेत. रमाकांत आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन आणि अमरे यांनी क्रिकेटचे धडे गिरवले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर या दोघांनीही चांगले नाव कमावले होते.
अमरे यांच्या वाढदिवसाला सचिनने ट्विट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या ट्विटमध्ये सचिन म्हणाला आहे की, " प्रवीण अमरे तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. जेव्हा तू मला शूज भेटवस्तू म्हणून दिले होते, तेव्हा मी शतक झळकावले होते. त्यामुळे तुझी ही भेट माझ्या कायम स्मरणात राहील. आपली मैत्रीही अशीच चिरतरुण राहील. "
सचिनने केलेले ट्विट