Join us  

Ind Vs NZ : VVS लक्ष्मणनं अजिंक्य रहाणेच्या शॉट सिलेक्शनवर उपस्थित केला प्रश्न; म्हणाला, "तुम्ही कानपूरमध्ये.."

Ind Vs Nz Test Series : पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यांच्या शॉट सिलेक्शनवर व्हीव्हीएस लक्ष्मणनं व्यक्त केला संताप.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 7:21 PM

Open in App

Ind Vs Nz Test Series : कानपूर कसोटीत कर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या कामगिरीकडे साऱ्यांच्या नजरा होत्या, परंतु या अनुभवी जोडीला फार प्रभाव पाडता आला नाही. दरम्यान, अजिंक्य रहाणे बाद झाल्यानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मण यानं अजिंक्यच्या शॉट सिलेक्शनवर प्रश्न उपस्थित केले. न्यूझीलंड विरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात त्याला ३५ धावा करता आल्या.

कामगिरीवरून यापूर्वी अनेकदा अजिंक्य रहाणेवर टीका करण्यात आली होती. तसंच त्याच्या फॉर्मच्या दृष्टीनं ही मालिका त्याच्यासाठी महत्त्वाची असल्याचंही म्हटलं जात आहे. भारतीय संघ या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. तसंच विराट कोहली, रोहित शर्मा परतल्यानंतर त्याला संघात स्थान बनवून ठेवण्यासाठी उत्तम फॉर्ममध्ये असणं आवश्यक आहे. अजिंक्य रहाणेनं सुरूवात अतिशय चांगली केली आणि त्यानं २५ धावा केल्या. परंतु काइल जॅमिसनच्या एका लेंथ बॉलवर तो बोल्ड झाला. अजिंक्य ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू खेळायला गेला, परंतु तो चेंडू स्टँप्सवर लागला. रहाणेला जितकी अपेक्षा होती तितकी त्या चेंडूनं उसळी घेतली नाही.

व्हीव्हीएस लक्ष्मणनं स्टार स्पोर्ट्सवर त्याच्या विकेटबद्दल बोलताना, त्यानं हा शॉट दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियात खेळला पाहिजे असं म्हटलं. तसंच अशाप्रकारच्या पीचवर त्यानं हा शॉट खेळल्याबद्दल लक्ष्मणनं आश्चर्यही व्यक्त केलं. "अशा प्रकारचा शॉट तुम्ही दक्षिण आफ्रिका किंवा ऑस्ट्रेलियात खेळू शकता. जर जागाही नसली तरी बाऊन्समुळे तुम्ही स्क्वेअरवर खेळू शकता. परंतु कानपूरमध्ये तुम्ही असं करू शकत नाही. या ठिकाणी बॉल बाऊन्स होत नाही. इथे तुम्हाला चेंडू सरळ बॅटनं खेळायला हवा, तुम्ही अँगल बॅटनं खेळू शकत नाही," असं लक्ष्मण म्हणाला.

टॅग्स :अजिंक्य रहाणेभारतीय क्रिकेट संघ
Open in App