Join us

तुम्ही तुमचं वय लपवताय, आता होऊ शकते 'ही' शिक्षा

काही वेळा कुठे तरी अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा खेळण्यासाठीही वय लपवलं जातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:49 IST

Open in App
ठळक मुद्देतुम्ही खरंच तुमचं वय लपवलं असाल तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते.या प्रकरणात जर तुम्ही सापडलात तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते.

मुंबई : काही वेळा लोकं वय लपवतात. आपलं खरं वय ते सांगत नाहीत. पण आता जर तुम्ही खरंच तुमचं वय लपवलं असाल तर तुमच्यावर कडक कारवाई होऊ शकते. त्यामुळे या प्रकरणात जर तुम्ही सापडलात तर तुम्हाला मोठी शिक्षा होऊ शकते.

काही वेळा कुठे तरी अॅडमिशन घेण्यासाठी वय लपवलं जातं. काहीवेळेला खेळामधील विविध वयोगटांतील स्पर्धा खेळण्यासाठीही वय लपवलं जातं. प्रत्येक खेळाला ही कीड लागलेली आहे आणि यावर आता कोणतीही उपाययोजना करता आलेली नाही. त्यामुळेच आता काही संघटनांनी पुढे येऊन कडक पाऊल उचलले आहे.

भारतातील सर्वात श्रीमंत क्रीडा संघटना असलेल्या बीसीसीआयने आता वय लपवणाऱ्या खेळाडूंवर कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. जर एखादा खेळाडू वय चोरीप्रकरणात अडकला तर त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात येणार आहे. या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये दोषी खेळाडूला बीसीसीआयच्या एकाही स्पर्धेत खेळता येणार नाही.

टॅग्स :बीसीसीआय