इंग्लंडच्या मैदानात पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जैस्वालनं अर्धशतकी खेळीसह खास विक्रम सेट केला आहे. तीन वेगवेगळ्या देशात पहिल्या कसोटी सामन्यात ५० पेक्षा अधिक धावा करत त्याने SENA देशांत तलवार म्यान करण्यापेक्षा शिताफिनं लढण्यात सक्षम असल्याची झलकच त्याने दाखवून दिलीये. लीड्सच्या हेडिंग्लेच्या मैदानात यशस्वी जैस्वाल याने संयमी खेळी करत आपल्यातील धमक दाखवलीये. ऑस्ट्रेलियन मैदानात खेळताना पहिल्या सामन्यात जो तोरा दाखवला तोच तोरा आता त्याने इंग्लंडच्या मैदानात दाखवला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तीन वेगवेगळ्या देशांत पहिल्या कसोटीत ५० पेक्षा अधिक धावांचा रेकॉर्ड
इंग्लंड दौऱ्यासह यशस्वी जैसवाल आतापर्यंत चार परदेशी मैदानात खेळला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात त्याला पदार्पणाच्या सामन्यात छाप सोडता आली नव्हती. पण वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या मैदानात पहिल्या सामन्यातच त्याने मोठी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. जुलै २०२३ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध पदार्पणाच्या कोसटी सामन्यात त्याने १७१ धावांची दमदार खेळी केली होती. याच वर्षी तो दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात खेळला. पण इथं पहिल्या कसोटी सामन्यात तो पहिल्या डावात १७ आणि दुसऱ्या डावात ५ धावा करून बाद झाला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यावर दुसऱ्या डावात सर्व कसर भरून काढत १६१ धावांची दमदार खेळी केली होती.
Web Title: Yashasvi Jaiswal Scores 50+ on Test Debut in 3 Different Overseas Nations India's Next Star in SENA Tours See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.