यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिका..! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून बेन डकेटची कानउघडणी

भारताच्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal)  इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 12:43 PM2024-02-20T12:43:14+5:302024-02-20T12:43:26+5:30

whatsapp join usJoin us
 Yashasvi Jaiswal hasn’t learned from you, he has learned from his upbringing: Nasser Hussain hit back to Ben Duckett | यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिका..! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून बेन डकेटची कानउघडणी

यशस्वी जैस्वालकडून काहीतरी शिका..! इंग्लंडच्या माजी कर्णधाराकडून बेन डकेटची कानउघडणी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs England Test Series ( Marathi News ) :  भारताच्या युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने ( Yashasvi Jaiswal)  इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन कसोटींत त्याच्या ५०० हून अधिक धावा झाल्या आहेत आणि अजून २ कसोटी बाकी आहेत. यशस्वीच्या आक्रमक फटकेबाजीवर इंग्लंडचा फलंदाज बेन डकेट याने आश्चर्यकारक वक्तव्य केले होते. डकेट म्हणाला होता  की, ''यशस्वी आक्रमक फटकेबाजी आमच्याकडून शिकला आहे.'' पण, डकेटच्या या विधानावरून इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन नाराज झाला आणि त्याने डकेटची कानउघडणी केली.  

यशस्वीने राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडच्या गोलंदाजांचा पार पालापाचोळा केला. कसोटीच्या तिसऱ्या दिवशी जैस्वालने द्विशतक झळकावून आपल्या कौशल्याचे दर्शन घडवले. या मालिकेतील त्याचे हे सलग दुसरे द्विशतक ठरले. त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर बेन डकेट म्हणाला होता की, जेव्हा तुम्ही विरोधी संघातील खेळाडूंना असे आक्रमक खेळताना पाहता तेव्हा वाटते की, कसोटी क्रिकेटमधील त्यांच्या अपारंपरिक दृष्टिकोनाला मान्यता मिळायला हवी. यशस्वी जैस्वालच्या फलंदाजीत बेसबॉल भरलेला आहे. 

इंग्लंडचा माजी कर्णधार हुसेनने बेन डकेटच्या वक्तव्याशी असहमती दर्शवताना त्याला खूप फटकारले. स्काय स्पोर्ट्सवर बोलताना हुसेन म्हणाला, 'जैस्वाल तुमच्याकडून शिकलेला नाही. त्याचे संगोपन आणि इथपर्यंतच्या प्रवासात त्याने दाखवलेल्या चिकाटीतून तो शिकला आहे. जैस्वालवर टीका करण्यापेक्षा थोडा वेळ काढून त्याचे निरीक्षण करा आणि त्याच्याकडून शिका. मला आशा आहे की संघात काही आत्मपरीक्षण होत असेल. 

यशस्वी सध्या दोन द्विशतकांसह मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने सहा डावात १०९.० च्या सरासरीने ५४५ धावा केल्या आहेत. यशस्वीचे प्रशिक्षक ज्वाला सिंग यांनी आंतरराष्ट्रीय पदार्पणापूर्वीच सांगितले होते की, युवा फलंदाजाला नेटमध्ये षटकार मारण्याचे वेगळे प्रशिक्षण दिले जाते.

राजकोटमध्ये २२ वर्षीय डावखुऱ्या भारतीय सलामीवीराच्या २१४ धावांच्या शानदार खेळीमुळे यजमान संघाने इंग्लंडसमोर ५५७ धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले होते. मात्र, जडेजाच्या फिरकीसमोर इंग्लंडचा संपूर्ण संघ १२२ धावांत तंबूत परतला आणि भारताने ४३४ धावांनी मोठा विजय मिळवला. चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांची येथे होणार आहे. 

Web Title:  Yashasvi Jaiswal hasn’t learned from you, he has learned from his upbringing: Nasser Hussain hit back to Ben Duckett

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.