Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026 : लग्न की, विघ्न..! RCB च्या ताफ्यातून 'हा' गोलंदाज 'गायब' होण्यामागचं कारण काय?

गंभीर आरोपानंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे हा गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:18 IST

Open in App

आयपीएल स्पर्धेतील गत चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघातील खेळाडूंनी यंदाच्या हंगामातील तयारीला सुरुवात केली आहे. विराट कोहलीसह अनेक दिग्गज सराव शिबिरात घाम गाळत असताना जलदगती गोलंदाज यश दयाल मात्र सराव सत्राचा भाग असल्याचे दिसत नाही. १८ मार्चपासून सुरू झालेल्या RCB च्या शिबिरातून तो गायब होण्यामागचं कारण काय? असा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

RCB च्या ताफ्यातून हा गोलंदाज 'गायब' होण्यामागचं कारण काय?

आरसीबीच्या टीम बसवरील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोतही यश दयालची झलक  दिसत नाही. एवढेच नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून RCB फ्रँचायझी संघाने शेअर केलेल्या  कोणत्याही फोटो किंवा व्हिडिओमध्ये त्याचा चेहरा दिसलेला नाही.  तो बंगळुरूच्या ताफ्यातून दूर का? यंदाच्या हंगामात तो खेळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थितीत होत आहेत.

“ती बाळासोबत एकटीच… मला घरी थांबावेच लागेल!” PBKS चा स्टार लॉकी फर्ग्यूसन IPL आधी मोठ्या ब्रेकवर

लग्न की, ते विघ्न..

यश दयाल याने IPL च्या यंदाच्या हंगामाआधी सोशल मीडिया इन्फ्लुएंसर श्वेता पुंडीर हिच्यासोबत गुपचूप लग्न उरकले होते. श्वेताने इन्स्टाग्राम अकाउंटवरुन त्याच्यासोबतचे खास फोटोही शेअर केले आहेत. लग्नानंतर ही जोडी भटकंती करतानाचे खास क्षणही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एवढेच नाही तर तिने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून यश दयाल सराव करतानाचा व्हिडिओही शेअर केला होता. त्यामुळे लग्न बंधनात अडकल्यामुळे तो संघाला उशीरा जॉईन होणार की, फिल्डबाहेरील वादग्रस्त गोष्टीचे विघ्न यंदाच्या हंगामात त्याच्या आडवे येणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  फ्रँचायझी संघानेही मात्र यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही.

 गंभीर आरोपानंतर  स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे यश दयाल 

 

यश दयाल याने गत हंगामात RCB ला पहिली वहिली ट्रॉफी मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. फायनल सामन्यात यशने ३ षटकांत १८ धावा खर्च करत  १ विकेट घेतली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर जाईल, असे कुणालाही वाटले नव्हते. स्पर्धा संपल्यानंतर त्याच्याविरुद्ध बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल झाला. परिणामी गत हंगामानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर राहिला. उत्तर प्रदेशच्या या क्रिकेटसाठी UP टी 20 लीग २०२५ स्पर्धेलाही मुकला  होता. गोरखपूर लायन्स संघाने त्याच्यासाठी ७ लाख रुपये मोजले. पण गंभीर आरोपामुळे तो या लीगपासून दूरच राहिला. RCB नं त्याला ५ कोटींसह रिटेन केल्यावर इथंही त्याबाबतीत तेच घडणार का? असे चित्र निर्माण होताना दिसत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Marriage or Trouble? Why is RCB's Yash Dayal Missing?

Web Summary : Yash Dayal's absence from RCB's training camp sparks speculation. His recent marriage and past allegations raise questions about his participation in the upcoming IPL season. The franchise remains silent on the matter.
टॅग्स :आयपीएल २०२६इंडियन प्रिमियर लीग २०२५रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरआयपीएल २०२४इंडियन प्रीमिअर लीग