Join us
Daily Top 2Weekly Top 5

WWE स्टार ब्रॉक लेसनरचा वकील विराट कोहलीला म्हणाला 'बीस्ट'!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. त्याच्या बॅटीतून प्रत्येक सामन्यांत विक्रमांचे शिखर सर होत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 09:37 IST

Open in App

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे जगभर चाहते आहेत. त्याच्या बॅटीतून प्रत्येक सामन्यांत विक्रमांचे शिखर सर होत आहेत. त्यामुळे त्याच्यावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू आहे. WWEचा स्टार जॉन सिनानेही त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर विराटचे कौतुक केले होते. ज्या देशांमध्ये क्रिकेट फॉलो केला जात नाही तेथेही विराटची जादू पसरत आहे. मात्र, WWEचा स्टार ब्रॉक लेसनरचे वकील पॉल हेयमॅनने विराटचा उल्लेख बीस्ट ( दानव) असा केला आहे. 

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांत विराटने शतकं झळकावली. त्याचबरोबर त्याने वन डेतील दहा हजार धावांचा पल्लाही ओलांडला. त्यामुळे स्टार स्पोर्ट्स या वाहिनीने त्याचे कौतुक करताना  "Eat. Sleep. Hit 100s. Repeat!'' असे ट्विट केले. त्यावर हेयमॅनने प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,''विक्रमवीर कोहलीचे अभिनंदन...स्टार स्पोर्ट्सने माझा क्लाईंट ब्रॉक लेसनर याची #EatSleepConquerRepeat ही थीम कोहलीसाठी वापरली आहे. ब्रॉकसारखा तोही त्याच्या खेळातील बीस्ट आहे.''  

टॅग्स :विराट कोहलीडब्लू डब्लू ईभारत विरुद्ध वेस्ट इंडिज