१९ चेंडूंत ८० धावा : भारतीय फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग; १८ इनिंग्जमध्ये ३ द्विशतकांसह झळकावली ७ शतकं, मोठा विक्रम

WTC Final 2023 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये तयारीसाठी दाखल झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 04:38 PM2023-04-29T16:38:58+5:302023-04-29T16:39:58+5:30

whatsapp join usJoin us
WTC Final 2023 : Cheteshwar Pujara has 7 Hundreds including 3 double hundreds in last 18 innings in County Championship | १९ चेंडूंत ८० धावा : भारतीय फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग; १८ इनिंग्जमध्ये ३ द्विशतकांसह झळकावली ७ शतकं, मोठा विक्रम

१९ चेंडूंत ८० धावा : भारतीय फलंदाजाची ऑस्ट्रेलियाला वॉर्निंग; १८ इनिंग्जमध्ये ३ द्विशतकांसह झळकावली ७ शतकं, मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

WTC Final 2023 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या तयारीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडमध्ये तयारीसाठी दाखल झाला आहे. ७ ते ११ जुन या कालावधीत इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत-ऑस्ट्रेलिया हा सामना होणार आहे. BCCI ने नुकतीच या सामन्यासाठी टीम जाहीर केली आणि अजिंक्य रहाणेचे ११ महिन्यानंतर कसोटी संघात पुनरागमन केले. अशात भारताचा मधल्या फळीचा प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwa pujara) हाही इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. आयपीएल २०२३ मध्ये कोणत्याही संघाचा सदस्य नसलेला पुजारा इंग्लंडच्या ससेक्स संघाकडून खेळतोय आणि त्याने शनिवारी ग्लुसेस्टरशायर क्लबविरुद्ध दमदार शतक झळकावले. कौंटी क्रिकेटमधील मागिल १८ इनिंग्जमधील त्याचे हे सातवे शतक ठरले आणि त्याने त्यापैकी तिघांचे द्विशतकात रुपांतर केले आहे.

प्रथम फलंदाजीला आलेल्या ससेक्सची सुरुवात काही चांगली झाली नाही. टॉम हेन्स ( ३) माघारी परतल्यानंतर अली ओर ( ३६)व     टॉम अल्सोप ( ६७) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. संघाच्या ५८ धावा असताना अली बाद झाला. पण, कर्णधार चेतेश्वर पुजाराने तिसऱ्या विकेटसाठी टॉमसह ग्लुसेस्टरशायरच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. टॉम २१० चेंडूंचा सामना करून ६७ धावांवर माघारी परतला. पुजाराला जेम्स कोल्स ( ७४) याची चांगली साथ मिळाली. पुजाराने २२८ चेंडूंत नाबाद १३८ धावा करताना संघाची धावसंख्या ४ बाद ३७७ धावांपर्यंत नेली. त्यात १७ चौकार व २ षटकारांचा सामावेश आहे. 

चेतेश्वर पुजाराचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ५८वे शतक ठरले आणि यंदाच्या पर्वातील दुसरे शतक ठरले. त्याने वासीम जाफरच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रमाला मागे टाकले. भारताकडून सचिन तेंडुलकर व सुनील गावस्कर यांनी सर्वाधिक ८१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शतक झळकावली आहेत. राहुल द्रविड (६८), विजय हजारे(६०),चेतेश्वर ( ५८ )आणि वासीम जाफर ( ५७) यांचा क्रमांक त्यानंतर येतो.  

Web Title: WTC Final 2023 : Cheteshwar Pujara has 7 Hundreds including 3 double hundreds in last 18 innings in County Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.