Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : टीम इंडियाचा डाव आटोपला, तिसऱ्या दिवशी 71 धावांत गमावल्या 7 विकेट्स; 6.8 फुटाच्या गोलंदाजासमोर टेकले गुडघे

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2021 6:41 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : भारतीय संघाची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील तिसऱ्या दिवसाची सुरुवात निराशाजन राहिली. विराट कोहली, रिषभ पंत यांच्यानंतर अजिंक्य रहाणेवर सामन्याची मदार होती, परंतु किवी गोलंदाज निल वॅगनरनं त्याचा पोपट केला. लंच ब्रेकरनंतर तर भारताने एकाच षटकात दोन फलंदाज गमावले. कायले जेमिन्सननं पाच विकेट्स घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. WTC Final मध्ये एकाच डावात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच गोलंदाज ठरला. ( Jamieson, Wagner strike to put India on backfoot)

आयपीएलमध्ये RCBकडून खेळणाऱ्या कायले जेमिन्सननं टीम इंडियाला हा धक्का दिला. त्यानं विराटला 44 धावांवर पायचीत केलं अन् टीम इंडियाला कालच्या धावसंख्येत 3 धावांचीच भर घालता आली आहे. विराटनं DRS घेतला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. जेमिन्सननं कंजूस गोलंदाजी कायम राखताना रिषभ पंतवर दडपण निर्माण केलं. त्याला 22 चेंडूंत 4 धावाच करता आल्या. जेमिन्सनच्या चेंडूवर जोरदार फटका मारण्याचा रिषभचा प्रयत्न फसला अन् स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टॉम लॅथमनं सुरेख झेल टिपला. WTC Final 2021, WTC Final 2021

अजिंक्य रहाणेकडून अपेक्षा होत्या, परंतु घातकी फटका मारून तो 49 धावांवर माघारी परतला. निल वॅगनरनं सुरुवातीला दोन शॉर्ट बॉल टाकून अजिंक्यला त्यानं संभ्रमात टाकले अऩ् चौथ्या चेंडूवरील शॉर्ट बॉलचा वेग संथ ठेवला व अजिंक्यला चूकीचा फटका मारण्यास भाग पाडले. स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या टॉम लॅथमनं सोपा झेल घेतला. आर अश्विननं फटाफट 22 धावा केल्या, परंतु तोही टीम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तिसऱ्या दिवसाच्या लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात जेमिन्सननं इशांत शर्मा व जसप्रीत बुमराह यांना बाद केले. Ind vs NZ Test Final, WTC final 2021

मोहम्मद शमीनं खणखणीत चौकार मारून सुरुवात केली. पण, ट्रेंट बोल्टनं पुढच्याच षटकात जडेजाला ( 15) बाद करून भारताचा पहिला डाव 217 धावांत गडगडला. आजचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताची 3 बाद 146 अशी अवस्था होती अन् पाहता पाहता 71 धावांत 7 फलंदाज माघारी परतले. 

न्यूझीलंडकडून पहिल्या 8 कसोटी सामन्यांत सर्वाधिक 42* विकेट्स घेण्याचा विक्रम जेमिन्सननं नावावर केला. त्यानं जॅक कोवी ( 1937-1949) यांचा 41 विकेट्सचा विक्रम मोडला. त्यानंतर शेन बाँड ( 38), डॉज ब्रेसवेल ( 33) व हेडली होवर्थ ( 32) यांचा क्रमांक येतो.  Ind Vs NZ test Score, NZ vs IND Test today

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड