Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : भारत-न्यूझीलंड यांना संयुक्त जेतेपद मिळणे जवळपास पक्के, समोर आली मोठी बातमी

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 7:40 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलचा चौथा दिवस पावसामुळे रद्द करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. त्यामुळे आता दोन दिवसांत या सामन्याचा निकाल न लागल्यास भारत व न्यूझीलंड या दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाणार आहे. साऊदॅम्प्टन येथील हवामानाच्या लहरीपणाचा फटका पहिल्या दिवसाला बसला त्यानंतर दुसरा व तिसरा दिवस पावसाच्या लपाछपीत खेळवण्यात आला. पाचव्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता कमी असली तरी उर्वरित दोन दिवसांत निकाल लागणे अवघड आहे. WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

तिसऱ्या दिवशी 3 बाद 146 धावांवरून सुरूवात करणाऱ्य़ा टीम इंडियाचा डाव किवी गोलंदाजांनी 217 धावांवर गुंडाळला. त्यानंतर टॉम लॅथम व डेव्हॉन कॉनवे यांनी 70 धावांची सलामी देताना टीम इंडियाला हैराण केले. र अश्विननं भारताला पहिली विकेट मिळवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 25 वेळा पहिली विकेट घेण्याच्या अनिल कुंबळे यांच्या विक्रमाशी अश्विननं बरोबरी केली. इशांत शर्मानं किवीला दुसरा झटका दिला. खेळपट्टीवर सेट झालेल्या कॉनवेला त्यानं बाद केलं, मोहम्मद शमीनं सुरेख झेल टिपला. कॉनवेनं 153 चेंडूंत 6 चौकारांसह 54 धावांची खेळी केली. रॉस टेलर व केन विलियम्सन ही अनुभवी जोडी मैदानावर असताना अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. किवींच्या 2 बाद 101 धावा झाल्या असून ते 116 धावांनी पिछाडीवर आहेत.  WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

विजेत्या संघाला मिळणार 1.6 मिलियन डॉलर तर उपविजेत्याला...जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील विजेत्या संघाला आयसीसीकडून 1.6 मिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख, 74,022.40 इतकी बक्षीस रक्कम दिली जाणार आहे, तर उपविजेत्या संघाला 8 लाख अमेरिकन डॉलर म्हणजे 5 कोटी 85 लाख 87,011.20 रुपये दिले जातील. आयसीसीचे CEO जेफ अॅलार्डीस यांनी ही माहिती दिली. जर सामना ड्रॉ झाला तर दोन्ही संघांमध्ये बक्षीस रक्कमेची  समान विभागणी केली जाईल.   

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड