Join us  

WTC Final 2021 IND vs NZ : बोट मोडलं तरी सोडलं नाही मैदान; न्यूझीलंडच्या यष्टिरक्षकानं झेल घेत भारताचं केलं नुकसान!

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी मैदानावर उतरताच भारताचा कर्णधार विराट कोहली यानं न्यूझीलंडचा यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग ( BJ Watling) याला हस्तांदोलन केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2021 6:44 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सहाव्या व निर्णायक दिवशी मैदानावर उतरताच भारताचा कर्णधार विराट कोहली यानं न्यूझीलंडचा यष्टिरक्षक बीजे वॉटलिंग ( BJ Watling) याला हस्तांदोलन केलं. बीजे चा हा अखेरचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे, इंग्लंड दौऱ्यावर येण्यापूर्वीच त्यानं निवृत्तीची घोषणा केली होती आणि त्याला पुढील आयुष्यासाठी विराटनं शुभेच्छा दिल्या. पण, कारकिर्दीतील अखेरच्या सामन्यात बीजे वॉटलिंगचं बोट मोडलं. लंच ब्रेकपूर्वी रवींद्र जडेजाल रन आऊट करण्यासाठी आलेला थ्रो त्याच्या बोटावर जोरात आदळला अन् त्याला उपचार घ्यावे लागले. लंच ब्रेकमध्ये त्यानं उपचार घेतले अन् पुन्हा मैदानावर उतरण्याचा निर्णय घेतला. मोडलेल्या बोटात ग्लोज घालून यष्टिरक्षक करणाऱ्या बीजेच्या खिलाडूवृत्तीचं सर्वच कौतुक करत आहेत. रवींद्र जडेजाचा झेल टिपून बीजेनं टीम इंडियाला मोठा धक्का दिला.

क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं अन् भारतीय चाहत्याची झाली अशी अवस्था, Video ब्रेंडले जॉन वॉटलिंग असे त्याचे पूर्ण नाव आहे. त्यानं न्यूझीलंडकडून ७४ कसोटीत ३७.८९च्या सरासरीनं ३७८९ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर ८ शतकं व १९ अर्धशतकं आहेत आणि २०५ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी आहे. त्यानं २८ वन डे व ५ ट्वेंटी-२०तही राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यानं ट्वेंटी-२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय करियरला सुरूवात केली. कसोटीत त्यानं २६२ झेल व ८ स्टम्पिंग केले आहेत.  

न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी पहिल्या सत्रात कर्णधार विराट कोहली, चेतेश्वर पुजारा आणि उप कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या विकेट्स घेत टीम इंडियाची अवस्था ५ बाद १०९ अशी केली. रिषभ-रवींद्रनं लंच ब्रेकपर्यंत एकही विकेट पडू न देता धावसंख्या ५ बाद १३० वर नेऊन ९८ धावांची आघाडी मिळवून दिली आहे. कोहली व पुजारा माघारी परतल्यानंतर रिषभ व अजिंक्य हे चांगले खेळत होते. पण, बोल्टनं ही भागीदारी तोडली. रवींद्र जडेजा व रिषभ यांनीही संयमी खेळ केला, परंतु लंच ब्रेकनंतर निल वॅगनरनं भारताला सहावा धक्का दिला. जडेजा १६ धावांवर बाद झाला. भारतानं १४२ धावांवर सहावी विकेट गमावली.

 

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड