Join us  

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : विराट कोहलीच्या त्या कृतीने चाहते निराश, दिला ख्रिस्तियानो रोनाल्डोकडून शिकण्याचा सल्ला!

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) सध्या Coca Cola बॉटल्समुळे चर्चेत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 4:05 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो ( Cristiano Ronaldo) सध्या Coca Cola बॉटल्समुळे चर्चेत आहे. फिटनेससाठी आग्रही असलेला रोनाल्डो शितपेय पीणे टाळतो. त्यामुळे यूरो चषक स्पर्धेच्या पहिल्या लढतीपूर्वी रोनाल्डोनं पत्रकार परिषदेत येताच समोरील कोका कोलाच्या बॉटल्स टेबलाखाली ठेवल्या. त्यामुळे कोका कोला कंपनीला 4 अब्ज डॉलर्सचा फटका बसला. आता भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याच्याकडूनही चाहत्यानं तशीच अपेक्षा व्यक्त केली. WTC Finalच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत विराटच्या टेबलावर कोका कोलाच्या दोन बॉटल्स होत्या, परंतु कोहलीनं त्या हटवल्या नाही अन् चाहते नाराज झाले. 

दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना टीम इंडियानं वाहिली श्रद्धांजली, केलं असं काही की वाटेल अभिमान

विराटही फिटनेसच्या बाबतीत सजग आहे. त्यामुळे त्यानं समोरील कोका कोलाच्या बॉटल तशाच ठेवल्यानं चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली. विराटनंही रोनाल्डोसारखं करायला हवं होतं, असं अनेकांनी मत व्यक्त केलं. 

रोनाल्डो हा फिटनेसच्या बाबतीत किती सतर्क आहे, हे सर्वांना माहीत आहे. त्यामुळेच वयाच्या 36व्या वर्षीही तो मैदानावर युवा खेळाडूंप्रमाणे खेळ करू शकतो. तो दिवसाला सहा वेळा जेवतो, त्यात फळ, भाज्या आणि प्रोटीन यांचा समावेश असतो. त्याशिवाय तो कसून सरावही करतो. 2020च्या एका पुरस्कार सोहळ्यात रोनाल्डोनं त्याच्या मुलाला सॉफ्ट ड्रींक्स पिताना व चिप्स खाताना पाहिले होते आणि त्यानंतर त्यानं नाराजी व्यक्त केली होती.

RECORD ALERT: विराटने MS Dhoniचा विक्रम मोडला, तर रोहित शर्मानं केला जगात भारी पराक्रम  

आता रोनाल्डोनं Coca Cola च्या दोन बॉटल्स हलवल्या अन् दुसरीकडे शेअर बाजारही गडगडला. रोनाल्डोच्या त्या कृतीनं Coca Colaचे स्टॉक्स 1.6% टक्क्यांनी कोसळून ते 242 बिलियन अमेरिकन डॉलरवरून 238 बिलियन अमेरिकन डॉलरवर आले. कोका कोला कंपनीला 4 बिलियन अमेरिकन डॉलरचा फटका बसला... भारतीय रक्कमेत सांगायचे तर हे नुकसान 2,93,27,80,00,000 इतके मोठे आहे.

टॅग्स :विराट कोहलीख्रिस्तियानो रोनाल्डो