Join us  

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : दुसऱ्या दिवसाचा खेळही वाया जाणार?, काय सांगतोय हवामानाचा अंदाज?

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 2:07 PM

Open in App
ठळक मुद्देटॉस अजून न झाल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) त्यांच्या अंतिम 11 बदल करण्यासाठी संधी आहे.

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला आहे. त्यामुळे आजपासून भारत-न्यूझीलंड ऐतिहासिक कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. पहिला दिवस वाया गेल्यामुळे आता 23 जून हा राखीव दिवसापर्यंत कसोटी चालणार आहे आणि आता पाच दिवसात निकाल न लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद दिले जाणार आहे. पण, आजच्या दिवसावरही पावसाचे सावट आहे, परंतु सध्यातरी पाऊसानं विश्रांती घेतली आहे. मागील 12 तासांत पाऊस पडलेला नाही आणि सकाळी सूर्याचे दर्शन झाले आहे. त्यामुळे आज खेळ सुरू होईल, परंतु पावसाचा व्यत्यय अधूनमधून क्रिकेट चाहत्यांना सहन करावा लागेल. ( WTC Final Day 2: Cloud cover looming over Rose Bowl but no rain yet) 

दरम्यान  टॉस अजून न झाल्यामुळे कर्णधार विराट कोहलीला ( Virat Kohli) त्यांच्या अंतिम 11 बदल करण्यासाठी संधी आहे. याबाबत टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर ( R Sridhar) यांनीही त्यांचं मत मांडले आहे. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर पत्रकार परिषदेसाठी आलेले टीम इंडियाचे क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनाही त्याबाबत विचारणा झाली. त्यांनी, नाणेफेक अजून झालेली नाही, त्यामुळे बदल करण्याची गरज वाटत असल्यास तो केला जाईल, असे सांगितले.   WTC Final 2021, WTC Final 2021

आता खेळपट्टी व हवामान यांचा अंदाज घेता टीम इंडिया अंतिम 11मध्ये एक बदल करण्याची शक्यता आहे. भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनीही तसा सल्ला टीम इंडियाला दिला. त्यांनी सांगितले की, नाणेफेक करण्यापूर्वी टीम बदलली जाऊ शकते. जोपर्यंत दोन्ही कर्णधार खेळाडूंच्या नावाची यादी एकमेकांना देत नाहीत, तोपर्यंत काहीच अंतिम नसतं. त्यामुळे भारतानं एका फिरकीपटूला बसवून अतिरिक्त फलंदाज खेळवायला हवा.''Ind vs NZ Test Final, WTC final 2021

भारतीय संघ- रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रिषभ पंत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी  IND vs NZ World Test Championship

न्यूझीलंडचा संघ - केन विलियम्सन ( कर्णधार), टॉम ब्लंडल, ट्रेंट बोल्ट, डेव्हॉन कॉनवेय, कॉलीन डी ग्रँडहोम, मॅट हेन्री, कायले जेमिन्सन, टॉम लॅथम, हेन्री निकोल्स, अजाझ पटेल, टीम साऊदी, रॉस टेलर, नेल वॅगनर, बीजे वॉटलिंग, विल यंग

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड