Join us  

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test : अम्पायरनं केली चिटिंग, न्यूझीलंडचा DRS वाचवला; विराट कोहलीनं कडक शब्दात जाब विचारला

WTC final 2021 Ind vs NZ 1st Test :रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 6:55 PM

Open in App

World Test Championship (WTC) final India vs New Zealand : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र दोन्ही संघांच्या नावावार. रोहित शर्मा व शुबमन गिल यांची दमदार सुरूवात करून दिली, परंतु न्यूझीलंडचे गोलंदाज कायले जेमिन्सन व निल वॅगनर यांनी दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवले. त्यानंतर विराट कोहलीचेतेश्वर पुजारा यांनी संयमी खेळ करताना विकेट सांभाळून ठेवली होती. पण, ट्रेंट बोल्टनं ही जोडी तोडली. पुजाराला बाद केले त्याच षटकात बोल्टनं विराटसाठी जोरदार अपील केली आणि तेव्हा मैदानावरील अम्पायरनेही त्यांना साथ दिली. अम्पायरच्या या चिटिंगवर सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ( Umpire should have raised his finger if he wanted to give it out. Just saved a review for New Zealand) 

रोहित व शुबमन यांची 62 धावांची भागीदारी कायले जेमिन्सननं संपुष्टात आणली. विशेष म्हणजे ही विकेट घेण्यापूर्वी जेमिन्सननं 5 षटकं फेकली अन् त्याच्या एकाही चेंडूचा रोहितनं सामना केला नाही. सहाव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर जेमिन्सननं रोहितला स्लीपमध्ये उभ्या असलेल्या टीम साऊदी करवी 34 धावांवर बाद केले. निल वॅगनर यानं त्याच्या पहिल्याच षटकात शुबमन गिलला ( 28 ) बाद केले.  WTC Final 2021, WTC Final 2021, Ind vs NZ Test Final

काळजाचा ठोका चुकला, किवी गोलंदाजाच्या बाऊन्सरनं चेतेश्वर पुजाराच्या हेल्मेटलचे केले दोन तुकडे

विराट व पुजारा यांनी संयमी खेळ करताना टीम इंडियाची आणखी विकेट पडू दिली नाही. पूजारानं 35 चेंडू निर्धाव खेळल्यानंतर पहिली धाव चौकारानं घेतली. 37व्या षटकात निल वॅगनरनं टाकलेला बाऊन्सनर पुजाराच्या हेल्मेटवर जोरात आदळला अन् त्याच्या हेल्मेटचे दोन तुकडे झाले. त्यानंतर लगेचच टीम इंडियाची वैद्यकिय टीम धाऊन आली. प्राथमिक उपचारानंतर पुजारानं पुन्हा खेळण्यास सुरूवात केली. ही जोडी तोडण्यास ट्रेंट बोल्टला पाचारण करण्यात आले आणि त्यानं 54 चेंडूंत दोन चौकारांसह 8 धावा करणाऱ्या पुजाराला पायचीत करून माघारी पाठवले. पुजारा व विराट यांनी तिसऱ्या विकेटसाठी 95 चेंडूंत 25 धावांची भागीदारी केली. WTC final 2021, Ind vs Nz WTC Final Today

जाणून घ्या नेमकं काय झालं..41व्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर विराट कोहलीचा खेळण्याचा प्रयत्न फसला अन् यष्टिरक्षक बीजे वॉटलिंगनं जोरदार अपील केले. ट्रेंट बोल्टही आत्मविश्वासपूर्णक अपील करत होता आणि त्यानं कर्णधार केन विलियम्सनला DRS घेण्यास सांगितले. पण, हो ना, हो ना करता करता DRS घेण्याची वेळ निघून गेली. तरीही मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ यांनी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली. त्यांच्या या निर्णयावर सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले. विराटनेही कडक शब्दात त्यांना जाब विचारला. पण, त्यानं वेगळंच कारण दिले. सुदैवानं विराट बाद झाला नाही. पण, अम्पायरच्या या भूमिकेवर शंका व्यक्त केली जात आहे.IND vs NZ World Test Championship

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाविराट कोहलीचेतेश्वर पुजारा