Join us

Wriddhiman Saha: वृद्धिमान साहाचा मोठेपणा! धमकी देणाऱ्या पत्रकाराला दिली माफी मागण्याची संधी

Wriddhiman Saha: BCCI ने वृद्धिमान साहाला पाठिंबा दिला आणि त्या पत्रकाराचे नाव सांगण्यास सांगितले. पण, साहाने नाव सांगण्यास नकार दिला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 17:11 IST

Open in App

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा (Wriddhiman Saha)  याला एका पत्रकाराने धमकी दिली होती. त्याबाबतच एक स्क्रीनशॉटही साहानेमुट्विटरवर शेअर केला. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) या प्रकरणात साहाला पाठिंबा दिला आणि धमकी देणाऱ्या पत्रकाराच्या नावासह संपूर्ण प्रकरण मेल करण्यास सांगितले. पण, साहाने आपले मोठे मन दाखवत बीसीसीआयला अद्याप पत्रकाराचे नाव सांगितले नाही. पत्रकाराला माफी मागण्याची संधी मिळावी, अशी त्याची इच्छा आहे.

संपूर्ण प्रकरण बीसीसीआयला मेल केलेरिद्धिमान साहाने मीडियाला सांगितले की, 'पत्रकाराने अद्याप माफी मागितलेली नाही. मी बीसीसीआयला सर्व प्रकरण सांगितले असून, त्यांनी मला पाठिंबा दिला आहे. मला त्या पत्रकाराचे नावही विचारले, पण मी अजून त्यांना नाव सांगितले नाही. त्या व्यक्तीला विचार करण्याची संधी दिली पाहिजे, असे साहा म्हणाला.

वाद निर्माण करायचा नव्हतातसेच, त्या व्यक्तीला पश्चात्ताप झाला, तर तो माझी माफी मागेन. त्याने माफी मागितली असती तर कदाचित मला दुसरे ट्विट करण्याची गरज भासली नसती. अशा गोष्टी घडत राहतात. या प्रकरणावरून वाद निर्माण करण्याचा माझा हेतू नव्हता, पण असे प्रकारही घडतात हे मला निदर्शनास आणून द्यायचे होते.

काय आहे प्रकरण?श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या भारतीय संघातून अनेक ज्येष्ठ खेळाडूंना बाहेरची वाट दाखवण्यात आली आहे. या खेळाडूंमध्ये भारतीय संघातील अनुभवी यष्टीरक्षक वृद्धिमान साहा यालाही संघातून डच्चू देण्यात आला होता. त्यानंतर साहाने एक स्क्रिनशॉट शेअर करत एका पत्रकाराने आपल्याला मुलाखत देण्यासाठी त्रास दिला, असा आरोप केला आहे. 

टॅग्स :वृद्धिमान साहाऑफ द फिल्डबीसीसीआय
Open in App