Join us

वृद्धिमान साहाची तुफानी खेळी, झळकावले झंझावाती शतक

बंगालकडून खेळाताना साहाने झंझावाती शतक झळकावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2019 18:00 IST

Open in App

नवी दिल्ली : भारतीय संघातील स्थानासाठी झगडत असणाऱ्या वृद्धिमान साहाने आज तुफानी खेळी साकारत साऱ्यांना मंत्रमुग्ध केले. सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 स्पर्धेत बंगालकडून खेळाताना साहाने झंझावाती शतक झळकावले आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या बंगालला सुरुवातीलाच दोन धक्के बसले. त्यानंतर फलंदाजीला साहा उतरला आणि त्याने गोलंदाजीची पिसे काढायला सुरुवात केली. साहाने फक्त 62 चेंडूंमध्ये 16 चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर 129 धावांची भन्नाट खेळी साकारली. यावेळी साहाचा स्ट्राइक रेट होता 208.06. साहाच्या या फलंदाजीच्या जोरावर बंगालला अरुणाचल प्रदेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 6 बाद 234 असा डोंगर उभारता आला. या आव्हानाचा पाछलाग करताना अरुणाचल प्रदेशला 20 षटकांमध्ये 4 बाद 127 धावा करता आल्या आणि बंगालने 107 धावांनी मोठा विजय साकारला.

टॅग्स :वृद्धिमान साहा