Join us  

Wriddhiman Saha : वृद्धीमान सहाचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह; टीम इंडियाच्या अडचणीत होऊ शकते वाढ!

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha) याचा दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 2:34 PM

Open in App

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha) याचा दुसरा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय कसोटी संघातील फलंदाजाला आयपीएल २०२१मध्ये कोरोना झाला होता. त्यानंतर तो वीलगीकरणात होता. आयपीएलमधील कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानं स्पर्धा स्थगित करावी लागली. वरुण चक्रवर्थी, संदीप वॉरियर्स, लक्ष्मीपती बालाजी, मायकल हस्सी, टीम सेईफर्ट, अमित मिश्रा यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी निवडलेल्या २० जणांच्या सदस्यांमधील प्रसिद्ध कृष्ण याचाही कोरोना रिपोर्ट नुकताच पॉझिटिव्ह आला आहे. त्यात आता वृद्धीमानचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानं टीम इंडियाचं टेंशन वाढलं आहे. सहानं सांगितले होते की,मला सुरुवातीला खूप भीती वाटली. माझे कुटुंबीयही चिंतित होते.  

सहाचा पहिला कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, पण पुन्हा चाचणीत त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्याची प्रकृती ठणठणीत आहे. त्याच्या शरीरात कोरोनाची कोणतीच लक्षणे नाहीत. त्यानं सांगितलं की,''सुरुवातीच्या काही दिवसांत मला थकवा जाणवत होता. जराही विलंब न लावता मी वीलगीकरणात गेलो. त्यादिवशी कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला, परंतु मला वीलगीकरणात कायम ठेवले गेले. दुसऱ्या दिवशी मला ताप येण्यास सुरुवात झाली आणि तीन दिवसानंतर कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.''  

आता सहाचा तिसरा रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह आल्यानं त्याला वीलगीकरणातच रहावे लागेल. बीसीसीआयनं निवडलेल्या २० सदस्यीय संघात त्याची निवड झाली आहे. या दौऱ्याला जाण्यापूर्वी बीसीसीआय खेळाडूंची कोरोना चाचणी करणार आहे आणि त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या खेळाडूचा इंग्लंड दौरा तिथेच रद्द होईल, हे बीसीसीआयनं स्पष्ट केलं आहे.   

टॅग्स :वृद्धिमान साहाभारत विरुद्ध इंग्लंडजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा