India vs South Africa, Test : रिषभचा पत्ता कोहलीनेच कापला, पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2019 12:29 PM2019-10-01T12:29:14+5:302019-10-01T12:29:57+5:30

whatsapp join usJoin us
Wriddhiman Saha to keep wickets for India ahead of Rishabh Pant in South Africa series, confirms Virat Kohli | India vs South Africa, Test : रिषभचा पत्ता कोहलीनेच कापला, पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया

India vs South Africa, Test : रिषभचा पत्ता कोहलीनेच कापला, पहिल्या सामन्यात अशी असेल टीम इंडिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला बुधवारपासून सुरुवात होत आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना विशाखापट्टणम येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा प्रथमच कसोटीत सलामीला येणार आहे. शिवाय या सामन्यात रिषभ पंतला संधी मिळेल की नाही, याची उत्सुकता लागली होती. पंतला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही, त्यामुळे संघातील त्याच्या स्थानाबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. कर्णधार विराट कोहलीनंच पंतचा पत्ता कापला आहे. या सामन्यात आर अश्विनलाही अंतिम अकरामध्ये संधी मिळेल असे संकेत कोहलीनं दिले आहेत.

सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहली म्हणाला,''कसोटी मालिकेत वृद्धीमान साहच यष्टिरक्षकाच्या भूमिकेत असेल.'' याशिवाय आर अश्विन आणि रवींद्र जडेजा हेही संघात असतील, तर तिसरा फिरकी पर्याय म्हणून हनुमा विहारी संघात असेल, असेही कोहलीने स्पष्ट केले. सहानं दुखापतीवर मात करून दमदार कमबॅक केले आहे. आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याने खोऱ्यानं धावा केल्या आहेत.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
पहिला सामनाः 2 ते 6 ऑक्टोबर - विशाखापट्टणम, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
दुसरा सामनाः 10 ते 14 ऑक्टोबर - पुणे, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून
तिसरा सामनाः 19 ते 23 ऑक्टोबर - रांची, वेळ - सकाळी 9.30 वाजल्यापासून

भारताचा संघ : मयांक अग्रवाल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान सहा, आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा. 

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघः फॅफ ड्यू प्लेसिस ( कर्णधार), टेंबा बवुमा, थेयूनिस डी ब्रुयन, क्विंटन डी कॉक, डीन एल्गर, झुबायर हम्झा, केशव महाराज, एडन मार्क्राम, सेनुरन मुथूसामी, लुंगी एनगिडी, अॅनरीच नोर्टजे, व्हेर्नोन फिलेंडर, डॅन पिएड्त, कागिसो रबाडा, रुडी सेकंड.

Web Title: Wriddhiman Saha to keep wickets for India ahead of Rishabh Pant in South Africa series, confirms Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.