Join us  

कुस्ती संघटक पंढरीनाथ पठारे यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर; शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

खेलो इंडिया गाजवलेल्या खेळाडूंचाही होणार सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 8:58 PM

Open in App

मुंबई : आपल्या मार्गदर्शनाखाली अनेक आंतरराष्ट्रीय मल्ल घडविलेले आणि मैदानी खेळांसाठी वाहून घेतलेले ज्येष्ठ कुस्ती संघटक पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे यांना यंदाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिष्ठीत शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार घोषित झाला आहे. त्याचप्रमाणे, आतापर्यंत जगातील सहा अवघड खाडी यशस्वीपणे पोहण्याचा पराक्रम केलेल्या मुंबईचा जलतरणपटू प्रभात राजू कोळी याच्या नावाची साहसी खेळातील शिवछत्रपती पुरस्कारासाठी थेट निवड झाली. याआधी केंद्र सरकारच्या वतीने प्रभातला राष्ट्रीय साहसी क्रीडा पुरस्कार मिळाला आहे.  २२ फेब्रुवारीला (शनिवार) गेट वे ऑफ इंडिया येथे आयोजित दिमाखदार सोहळ्याद्वारे पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक व संघटक-कार्यकर्ते यांचा गौरव होईल.क्रीडा क्षेत्रात भरीव योगदान देणाºया खेळाडू, संघटक आणि प्रशिक्षकांना दरवर्षी शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.  २०१८-१९ वर्षासाठी यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची घोषणा राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार आणि क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. शिवछत्रपती पुरस्कारासाठी जीवनगौरव, मार्गदर्शक, खेळाडू, साहसी खेळ आणि दिव्यांग खेळाडू अशा एकूण पाच गटामध्ये एकूण ६३ व्यक्तींची वरील पाच गटांतून निवड झाली.

रिशांक देवाडिगा, गिरिष एरनाक आणि सोनाली शिंगटे या स्टार कबड्डीपटूंना थेट पुरस्कार जाहीर झाला असून यांच्यासह हिमानी परब (मल्लखांब) आणि श्वेता शेरवेगार (याचिंग) यांचीही या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी थेट निवड झाली. यंदाच्या राज्य क्रीडा पुरस्कार सोहळ्यात पहिल्यांदाच खेलो इंडिया स्पर्धा गाजवलेल्या महाराष्ट्राच्या विजयी खेळाडूंचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडामंत्री केदार यांनी दिली.

२०१७ साली दिल्ली येथे पहिल्यांदा झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. मात्र यानंतर २०१८ साली पुण्यात आपल्या यजमानपदाखाली सांघिक जेतेपदाला गवसणी घातलेल्या महाराष्ट्राने २०१९ मध्ये गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेतही वर्चस्व राखताना आपले सांघिक जेतेपद कायम राखले. गुवाहाटी येथे झालेल्या स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंवर एकूण ३.२५ कोटी रुपयांच्या बक्षिसांचा वर्षाव होईल. यामध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना १ लाख, रौप्य विजेत्यांना ७५ हजार आणि कांस्य पदक विजेत्यांना ५० हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल.

कार्यकर्ते-संघटकांसाठी वेगळा विचारयंदाच्या राज्य क्रीडा पुरस्कारासाठी शासनाने क्रीडा कार्यकर्ते व संघटक यांचा समावेश केलेला नाही. याविषयी विचारले असता क्रीडामंत्री केदार म्हणाले की, ‘राज्याच्या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी केवळ खेळाडूंचाच विचार झाला पाहिजे. कार्यकर्ते-संघटक यांची भूमिकाही महत्त्वाची आहे, मात्र त्यांच्यासाठी आमचा वेगळा विचार सुरु आहे.’शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर खेळाडूंना कामाच्या जबाबदारीमुळे आपल्या खेळाकडे लक्ष देण्यात अडचणी येतात. त्यामुळे महाराष्ट्र हरयाणा, रेल्वेसारख्या संघांच्या मागे राहतो. पण आता असे होणार नाही असे सांगताना क्रीडामंत्री केदार म्हणाले की, ‘या प्रकरणी माझे लक्ष असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.’ 

शिवछत्रपती पुरस्कार विजेते (२०१८-१९)शिवछत्रपती जीवनगौरव राज्य क्रीडा पुरस्कार :पंढरीनाथ उर्फ अण्णासाहेब पठारे -पुणे.उत्कृष्ट मार्गदर्शक :१. युवराज खटके (अ‍ॅथेलेटिक्स, सांगली)२. बाळासाहेब आवारे (कुस्ती, बीड - थेट पुरस्कार)३. नितीन खत्री (तायक्वांडो, पुणे)४. जगदीश नानजकर (खो-खो, पुणे)५. अनिल पोवार (पॅरा अ‍ॅथलेटीक्स, कोल्हापूर).

राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू)हर्षद हातणकर (मुंबई शहर, खो-खो), कविता घाणेकर (ठाणे, खो-खो), रिशांक देवाडिगा (मुंबई उपनगर), सोनाली शिंगटे (मुंबई शहर), गिरिष एरनाक (ठाणे) (तिघेही थेट पुरस्कार, कबड्डी), अश्विन पाटील (भंडारा, सायकलिंग), मधुरा वायकर (मुंबई शहर, सायकलिंग), पवन जयस्वाल (वाशिम, आट्यापाट्या), प्रिया गोमासे (भंडारा, आट्यापाट्या), अभिजीत कटके (पुणे, कुस्ती), अंकित गुंड (पुणे, कुस्ती), सुलतान देशमुख (नाशिक, कयाकिंग-कनोइंग), प्रियांका खेडकर (पुणे, व्हॉलिबॉल), सिद्धांत कांबळे (पुणे, स्केटिंग), साक्षी माथवड (पुणे, स्केटिंग), प्रियांका गौडा (मुंबई शहर, वुशु), हर्षल वखारिया (पुणे, जलतरण), अवंतिका चव्हाण (जलतरण), सुकमनी बाबरेकर (अमरावती, आर्चरी), किसन तडवी (नाशिक, अ‍ॅथलेटिक्स), अर्चना आढाव (पुणे, अ‍ॅथलेटिक्स), श्रुती अरविंद (पुणे, बास्केटबॉल), पियूष आंबुलकर (नागपूर, सॉफ्टबॉल), ईश्वरी गोतमारे (अमरावती, सॉफ्टबॉल), गौरव जोगदंड (औरंगाबाद, जिम्नॅस्टिक्स - अ‍ॅरोबिक्स), आदिती दांडेकर (मुंबई शहर, जिम्नॅस्टिक्स), श्रावणी राऊत (ठाणे, जिमनॅस्टिक्स - आर्टिस्टिक), वेदांगी तुळजापूरकर (मुंबई शहर, नेमबाजी), तुषार आहेर (औरंगाबाद, तलवारबाजी), दामिनी रंभाड (नागपूर, तलवारबाजी), अनंता चोपडे (अकोला, बॉक्सिंग), सुर्यभान घोलप (नाशिक, रोइंग), जागृती शहारे (नाशिक, रोइंग), निरज चौधरी (धुळे, तायक्वांदो), रुचिका भावे (पुणे, तायक्वांदो), विघ्नेश देवळेकर (ठाणे, बॅडमिंटन), संयोगिता घोरपडे (पुणे, बॅडमिंटन), गणेश शिंदे (मुंबई उपनगर, मल्लखांब), हिमानी परब (मुंबई शहर, मल्लखांब - थेट पुरस्कार), योगेश मेहर (पालघर, शरीरसौष्ठव), करुणा वाघमारे (मुंबई उपनगर, शरीरसौष्ठव), आकाश चिकटे (यवतमाळ, हॉकी), श्वेता शेरवेगार (यॉचिंग, थेट पुरस्कार), गिरिजा बोडेकर (कोल्हापूर, बेसबॉल), निलेश गराटे (मुंबई उपनगर, पॉवरलिफ्टिंग), सोनाली गिते (मुंबई शहर, पॉवरलिफ्टिंग). 

साहसी गट :१. प्रभात कोळी (मुंबई, खाडी पोहणे - थेट पुरस्कार)२. शुभम वनमाळी (ठाणे, खाडी पोहणे)३. अपर्णा प्रभुदेसाई (पुणे, गिर्यारोहण) 

दिव्यांग खेळाडू१. स्वप्नील पाटील (कोल्हापूर, जलतरणर - थेट पुरस्कार).२. पार्थ हेंद्रे (मुंबई, जलतरण).३. सायली पोहरे (नाशिक, जलतरण).४. जयदीपकुमार सिंह (मुंबई, ज्युदो).५. वैष्णवी सुतार (कोल्हापूर, टेबल टेनिस).

टॅग्स :महाराष्ट्र