WPL 2026: बंगळुरूचा यूपीवर दमदार विजय, ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी

WPL 2026: ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी, कर्णधार स्मृती मानधना हिचे अर्धशतक आणि नादिन डी क्लार्कच्या प्रभावी गोलंदाजींच्या  जोरावर बंगळुरू संघाने डब्लूपीएलमध्ये गुरुवारी यूपीवर आठ बळी आणि ४१ चेंडू राखून दमदार विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 06:07 IST2026-01-30T06:06:25+5:302026-01-30T06:07:07+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
WPL 2026: Bengaluru's emphatic win over UP, Grace Harris' brilliant all-round performance | WPL 2026: बंगळुरूचा यूपीवर दमदार विजय, ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी

WPL 2026: बंगळुरूचा यूपीवर दमदार विजय, ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी

वडोदरा - ग्रेस हॅरिसची शानदार अष्टपैलू कामगिरी, कर्णधार स्मृती मानधना हिचे अर्धशतक आणि नादिन डी क्लार्कच्या प्रभावी गोलंदाजींच्या  जोरावर बंगळुरू संघाने डब्लूपीएलमध्ये गुरुवारी यूपीवर आठ बळी आणि ४१ चेंडू राखून दमदार विजय मिळवला.

यूपीला २० षटकांत ८ बाद १४३ धावांवर रोखल्यानंतर बंगळुरूने १३.१ षटकांत दोन बाद १४७ धावा करत विजय साकारला. विजयासाठी १४४ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूकडून हॅरिस आणि मानधना यांनी ५५ चेंडूंत १०८ धावांची सलामी देत विजय रचला. शिखाने हॅरिसचा त्रिफळा उडवला. स्मृतीने जाॅर्जिया व्होल (१६) हिच्यासोबत ३५ धावा जोडत विजय निश्चित केला. स्मृतीने २७ चेंडूंत आठ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ५४ धावा केल्या. यूपीकडून शिखा पांडे आणि आशा सोभना यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.  त्याआधी, बंगळुरूने फलंदाजीने निमंत्रण दिल्यानंतर मेग लॅनिंग आणि दीप्ती शर्मा यांनी ८.१ षटकांत ७४ धावांची सलामी देत यूपीला चांगली सुरुवात करून दिली.  नादिन डी क्लार्कने लॅनिंगला बाद करत ही जोडी फोडली. लॅनिंगने ३० चेंडूंत सहा चौकार व एका षटकारासह ४१ धावा केल्या. त्यानंतर ॲमे जोन्स (१), हरलीन देओल (१४), क्लोई ट्रायोन (६), श्वेता सेहरावत (७) ही मधली फळी पूर्णपणे कोलमडली. 

संक्षिप्त धावफलक : यूपी : २० षटकांत ८ बाद १४३ धावा (दीप्ती शर्मा ५५, मेग लॅनिंग ४१)  गोलंदाजी : नादिन डी क्लार्क ४-२२, ग्रेस हॅरिस २-२२. बंगळुरू : १३.१ षटकांत २ बाद १४७ धावा (ग्रेस हॅरिस ७५,  मानधना नाबाद ५४) गोलंदाजी : आशा सोभना १-२४.

Web Title : डब्ल्यूपीएल 2026: बैंगलोर ने यूपी को हराया, हैरिस का शानदार प्रदर्शन

Web Summary : बैंगलोर ने डब्ल्यूपीएल 2026 में यूपी को आठ विकेट से हराया, ग्रेस हैरिस के शानदार प्रदर्शन और स्मृति मंधाना के अर्धशतक की बदौलत। नादिन डी क्लार्क की गेंदबाजी से यूपी 143 रनों पर सिमट गई, जिसके बाद हैरिस और मंधाना की साझेदारी ने जीत सुनिश्चित की।

Web Title : WPL 2026: Bangalore Dominates UP, Harris Shines with All-Round Performance

Web Summary : Bangalore defeated UP by eight wickets in WPL 2026, powered by Grace Harris's all-round brilliance and Smriti Mandhana's fifty. Harris and Mandhana's opening partnership set the stage after Nadine de Klerk's bowling restricted UP to 143.