Join us  

WTC Final Final playing conditions : फायनलचा निकाल ड्रॉ किंवा टाय लागल्यास कोण जिंकणार?; ICCची मोठी घोषणा

World Test Championship Final playing conditions announced : India and New Zealand to be crowned joint winners in case of a draw or a tie आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2021 11:04 AM

Open in App

World Test Championship Final playing conditions announced : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) शुक्रवारी आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलसाठीचे नियम जाहीर केले. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ ते २३ जून या कालावधीत साऊदॅम्पटन येथे WTC Final खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी आयसीसीनं २३ जून हा अतिरिक्त दिवस राखून ठेवला आहे, त्यामुळे या सामन्याच्या निकालासाठी सहावा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. पण, या सामन्याचा निकाल अनिर्णित किंवा बरोबरीचा लागल्यास दोन्ही संघांना संयुक्त जेतेपद देण्यात येईल, असे आयसीसीनं जाहीर केलं. ( The playing conditions confirm that a draw or a tie will see both teams crowned as joint winners)

निर्धारीत पाच दिवशी वाया जाणाऱ्या तासांची भरपाई राखीव दिवसात भरून काढली जाईल. त्यामुळे १८ ते २२ जूनला हा सामना खेळवण्यात येईल आणि २३ जून हा राखीव दिवस असेल. आयसीसीनं हे दोन्ही निर्णय जून २०१८मध्येच जेव्हा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली तेव्हा घेतले होते. पाच दिवसानंतरही निकाल न लागल्यास राखीव दिवशी खेळ होणार नाही आणि सामना अनिर्णित जाहीर केला जाईल.   

  • हा सामना ग्रेड १ ड्यूक क्रिकेट बॉलनं खेळवला जाईल 

 

बांगलादेश व श्रीलंका यांच्यात खेळवण्यात आलेल्या आयसीसी पुरुष क्रिकेट वर्ल्ड कप सुपर लीग सीरिजमधील बदल WTC Finalमध्येही दिसतील 

  • शॉर्ट रन ( Short Runs) - मैदानावरील पंचांनी शॉर्ट रनच्या दिलेल्या निर्णयाचा रिव्ह्यू तिसरा पंच करणार आहे.  
  • खेळाडूंचा रिव्ह्यू ( Player Reviews) - LBWचा निकाल दिल्यानंतर कर्णधार किंवा बाद झालेला फलंदाज मैदानावरील पंचांकडे चेंडू खेळण्याचा प्रयत्न झालेला होता का, याबाबत विचारणा करून प्लेअर रिव्ह्यू घेऊ शकतो.
  • डीआरएस ( DRS Reviews ) - LBW साठी स्टम्पवर आदळणाऱ्या चेंडूची उंची व लांबी यावरून अम्पायर्स कॉलचा निर्णय घेतला जाईल. 
टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध न्यूझीलंड