Join us  

World Record : ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स, मिळवला पहिला मान; मलिंगा, रशीद खान यांच्या पंक्तित स्थान

Worl Record : जर्मन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुराधा दोड्डाबल्लापूरनं शुक्रवारी विश्वविक्रमाला गवसणी घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 12:24 PM

Open in App

जर्मन महिला क्रिकेट संघाची कर्णधार अनुराधा दोड्डाबल्लापूरनं शुक्रवारी विश्वविक्रमाला गवसणी घातली. तिनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये चार चेंडूंत चार विकेट्स घेण्याचा विक्रम नावावर केला. असा पराक्रम करणारी ती पहिली महिला खेळाडू बनली आहे. पुरुषांमध्ये लसिथ मलिंगा ( 2007 व 2019) आणि रशीद खान ( 2019) यांनी अशी कामगिरी केली आहे. आता अनुराधा त्यांच्या पंक्तित जाऊन बसली आहे. जर्मनी विरुद्ध ऑस्ट्रीया यांच्यातल्या सामन्यात अनुराधानं 1 धाव देत 5 विकेट्स घेतल्या आणि जर्मनीला 137 धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. जर्मनी व ऑस्ट्रीया यांच्यातील ट्वेंटी-20 मालिकेतील हा चौथा सामना होता. 

जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात!

Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट!

प्रथम फलंदाजी करताना जर्मनीच्या संघानं बिनबाद 198 धावा चोपल्या. ख्रिस्टिना गौफनं 70 चेंडूंत 101 धावांचा पाऊस पाडला. या सामन्यात जर्मनीच्या डावात एकही षटकार लगावला गेला नाही, दोन्ही सलामीवीरांनी मिळून 19 चौकार मारले. गौफ आणि जॅनेट रोनाल्ड ( 68*) यांनी दुसऱ्यांना 190+ धावांची भागीदारी केली. यापूर्वी त्यांनी याचा मालिकेत पहिल्या विकेट्साठी 191 धावांची भागीदारी केली होती. गोलंदाजीत जर्मनीची कर्णधार अनुराधानं चार चेंडूंत चार विकेट्स घेऊन विश्वविक्रम नावावर केला.   तिच्या या भेदक माऱ्यासमोर ऑस्ट्रीयाच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ऑस्ट्रीयाच्या संघाला 20 षटकांत 9 बाद 61 धावाच करता आल्या. अनुराधानं जो-अँटोनेट स्टिग्लिट्स ( 1), ट्युगसे कझान्सी (0), अनिषा नूकाला (0) आणि प्रिया साबू ( 0) यांना 15व्या षटकांत बाद केले.  

टॅग्स :जर्मनीआयसीसीमहिला टी-२० क्रिकेट