Join us  

वर्ल्डकपमधील पराभवाची सल अजूनही मनाला टोचते: कोहली

संघातील प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली होती. पण, सातत्यपूर्ण कामगिरी करूनही उपांत्य फेरीत असे अचानक बाहेर फेकले जाणे, हे जिव्हारी लागणारे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 12:27 PM

Open in App

मुंबई : वर्ल्डकप स्पर्धेतील जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भारतीय संघाला उपांत्य फेरीतच गाशा गुंडाळावा लागला, यावर अद्यापही अनेकांचा विश्वास बसत नाही. त्यामुळेच या सामन्याची चर्चा आठवडाभरानंतरही सुरूच आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला या पराभवाची सल अजूनही टोचत आहे. त्यामुळेच सकाळी उठल्यानंतरही डोळ्यासमोर सर्वप्रथम त्या पराभवाचा क्षण समोर उभा राहतो, असे कोहलीनं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

कोहलीने सांगितले की, ''कोणतीही चूक न करता पराभव पत्करावा लागल्याचे खूप वाईट वाटते. संघातील प्रत्येकाने सर्वोत्तम कामगिरी केली होती. पण, सातत्यपूर्ण कामगिरी करूनही उपांत्य फेरीत असे अचानक बाहेर फेकले जाणे, हे जिव्हारी लागणारे आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धचा तो पराभव विसरणे अवघड आहे. पण, या पराभवानं बरेच काही शिकवले.''

भारतीय संघ वर्ल्डकप स्पर्धेतील उपांत्य फेरीतील अपयश विसरून पुढील महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) तीन वेगवेगळे संघ जाहीर केले ते पुढील प्रमाणे आहेत.

टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ  - टी-20  - विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

वनडे मालिकेसाठी भारतीय संघ  -वनडे -  विराट कोहली ( कर्णधार),  रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के.एल. राहुल, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक),  रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, नवदीप सैनी 

कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ  -कसोटी  - विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), मयांक अग्रवाल, के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रोहित शर्मा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमरा, उमेश यादव  

टॅग्स :भारतविराट कोहलीभारत विरुद्ध न्यूझीलंड