वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानच्या संघाची घोषणा, नावाजलेला गोलंदाज संघाबाहेर

संघात एका नामांकित वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली नसल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 18:59 IST2019-04-18T18:58:38+5:302019-04-18T18:59:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
World Cup 2019: Pakistan's World Cup team announcement, named bowler out of the team | वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानच्या संघाची घोषणा, नावाजलेला गोलंदाज संघाबाहेर

वर्ल्ड कप 2019: पाकिस्तानच्या संघाची घोषणा, नावाजलेला गोलंदाज संघाबाहेर

नवी दिल्ली : इंग्लंडमध्ये जून महिन्यात होणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानचा पंधरा सदस्यीय संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात एका नामांकित वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात आली नसल्याने साऱ्यांनाच धक्का बसला आहे.

पाकिस्तानच्या संघाचे नेतृत्व सर्फराझ अहमदकडे सोपवण्यात आले आहे. या संघात शोएब मलिक आणि मोहम्मद हफिझसारखे अनुभवी खेळाडू आहे. पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरला मात्र विश्वचषकासाठीच्या संघात निवडण्यात आलेले नाही. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेसाठी आमीरची निवड करण्यात आली आहे, पण विश्वचषकाच्या संघातून मात्र त्याला डावलण्यात आले आहे.

वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ-
सर्फराझ अहमद (कप्तान), इमाम उल हक, बाबर आझम, फखर जमान, आबिद अली, जुनैद खान, मोहम्मद हफीज, फहीम अशरफ, मोहम्मद हुसैन, शादाब खान, हारिस सोहेल, शाहीन अफरीदी, हसन अली, शोएब मलिक, इमाद वसीम।



Web Title: World Cup 2019: Pakistan's World Cup team announcement, named bowler out of the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.