Join us
Daily Top 2Weekly Top 5

World Cup 2019 : विराटला चीअर करायला अनुष्का इंग्लंडला जाणार

विराटसाठी अनुष्का ही लकी नसल्याचे चाहत्यांनी बऱ्याचदा म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2019 18:11 IST

Open in App

मुंबई : जून महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत विराट कोहलीला चीअर करण्यासाठी त्याची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा जाणार असल्याचे समजत आहे. यापूर्वी जेव्हा जेव्हा अनुष्का सामना पाहायला गेली तेव्हा बहुतांशीवेळा कोहलीला सामना जिंकता आलेला नाही, असे चाहते म्हणतात. त्यामुळे अनुष्का विश्वचषकासाठी इंग्लंडला जाणार असल्याचे कळताच काही चाहत्यांच्या मनात धस्स झालं आहे.

अनुष्का जेव्हा विराटबरोबर असते किंवा सामना पाहायला जाते तेव्हा ती  सर्वात जास्त ट्रोल होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने ऐतिहासिक मालिका विजय मिळवला तेव्हा अनुष्का कोहलीबरोबर मैदानात पाहायला मिळाली होती. तेव्हाही अनुष्का ट्रोल झाली होती. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा पाहायला गेला होता. त्यावेळी कोहलीबरोबर अनुष्काही होती. त्यावेळी विराट आणि अनुष्का यांनी टेनिस सम्राट रॉजर फेडररबरोबर फोटो काढला होता. हा फोटो जेव्हा सोशल मीडियावर आला तेव्हा अनुष्का सर्वात जास्त ट्रोल झाली होती. हे सारे झाल्यावरही अनुष्काने इंग्लंडमध्ये विश्वचषक पाहण्याचा निर्णय घेतला आहे.

विराटसाठी अनुष्का ही लकी नसल्याचे चाहत्यांनी बऱ्याचदा म्हटले आहे. कोहलीलाही ही गोष्ट खटकत असल्याचे पाहायला मिळाले आहे. कारण काही महिन्यांपासून अनुष्का जे सामना भारत जिंकेल असे वाटते त्याच सामन्यांना उपस्थित राहत असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आता अनुष्का विश्वचषकाच्या सर्व सामन्यांना जाणार की निवडक, याची उत्सुकता चाहत्यांना असेल.

लग्न करताच विरुष्का झाले होते ६०० कोटींचे मालक!!भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार विराट कोहली आणि त्याची प्रेयसी अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी इटलीतील एका सुंदर डेस्टिनेशनवर लग्न केले. अतिशय देखण्या अशा या लग्नसोहळ्याकडे त्यांच्या जगभरातील चाहत्यांचे लक्ष लागून होते. या दोघांच्या व्यावसायिक जीवनाविषयी सांगायचे झाल्यास, दोघेही त्यांच्या-त्यांच्या फिल्डमध्ये सर्वोच्च स्थानी आहेत. त्यामुळे या दोघांची कमाईदेखील प्रचंड आहे. जाहिरात क्षेत्रात तर दोघांचीही प्रचंड मागणी असल्याने आगामी काळात हे दोघे एकत्र आल्यास त्यांची व्हॅल्यू दुप्पटीने वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, विराट आणि अनुष्काच्या प्रॉपर्टीविषयी समोर येत असलेल्या बातम्यांनुसार, या दाम्पत्य लग्नानंतर सहाशे कोटी रूपयांपेक्षा अधिक संपत्तीचे मालक बनले आहेत. सध्या विराट ३९० कोटींचा मालक असून, अनुष्काची २२० कोटी इतकी संपत्ती आहे. अशात हे दोघे एकत्र आल्याने त्यांची संपत्ती सहाशे कोटींच्यावर गेली आहे. २००८ मध्ये बॉलिवूडचा किंग शाहरूख खानसोबत ‘रब ने बना दी जोडी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनुष्का सध्या बॉलिवूडमधील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंडस्ट्रीमधील तिन्ही खानसोबत काम केले असून, यांच्यासोबतचे जवळपास सर्वच चित्रपट सुपरडुपर हिट ठरले आहेत. त्यामुळे इंडस्ट्रीत अनुष्काची व्हॅल्यू अधिक आहे. अनुष्का तिच्या एका चित्रपटासाठी पाच कोटी रूपये फिस आकारते. शिवाय जाहिरातीसाठीदेखील ती अशाच स्वरूपाची तगडी रक्कम स्वीकारते. वर्षाकाठी केवळ जाहिरातींमधून ती चार कोटी रूपये कमाविते. अनुष्काचे एक फिल्म प्रॉडक्शन हाउस असून, त्यामधूनही तिची कमाई तगडी आहे. 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्मा