भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य

खरंच त्याने आफ्रिदीची भेट घेतलीये का? व्हायरल होणाऱ्या फोटोमागचं सत्य काय? जाणून घेऊयात सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 16:23 IST2025-07-21T16:16:51+5:302025-07-21T16:23:16+5:30

whatsapp join usJoin us
World Championship of Legends 2025 IND vs PAK Truth Behind Ajay Devgn's Meeting With Shahid Afridi In England As Pictures Go Viral | भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य

भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेतील भारत-पाक यांच्यातील सामना रद्द झाल्यावर सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. बर्मिंघहॅमच्या एजबेस्टनच्या मैदान रविवारी भारत-पाक दोन्ही संघातील दिग्गज आमने सामने येणार होते. पण दोन्ही देशांतील राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारतीय खेळाडूंनी सामन्यावर बहिष्कार टाकल्यामुळे आयत्यावेळी सामना रद्द करण्याची वेळ आली.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

नेटकऱ्यांनी अजय देवगणवर साधला निशाणा, कारण...

 एका बाजूला भारतीय ताफ्यातील दिग्गजांनी घेतलेल्या निर्णयावर सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रिया उमटत असताना बॉलिवूड अभिनेता अजय देवगण ट्रोल होताना दिसतोय. यामागचं कारण आहे त्याचा शाहिद आफ्रिदीसोबत व्हायरल होणारा फोटो. मैदानातील दोघांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी अजय देवगणवर निशाणा साधला आहे. पण खरंच त्याने आफ्रिदीची भेट घेतलीये का? व्हायरल होणाऱ्या फोटोमागचं सत्य काय? जाणून घेऊयात सविस्तर

IND vs PAK : या भारतीय क्रिकेटरचं नाव घेत शाहिद आफ्रिदीनं केला मोठा दावा, म्हणाला...
 
या भारतीय दिग्गजांनी पाकसोबत खेळण्यास दिला नकार

भारतीय चॅम्पियन्स संघाकडून शिखर धवन, युवराज सिंग, हरभजन सिंग आणि युसूफ पठाण आणि इरफान पठाण या बंधूंसह सुरेश रैनाही WCL 2025 च्या स्पर्धेत खेळत आहेत. या दिग्गजांनी पाकिस्तान विरुद्ध सामना खेळण्यास नकार दिल्यामुळे नियोजित लढत रद्द करण्याची वेळ आली. 

अजय देवगण- आफ्रिदीसोबतचा फोटो व्हायरल, पण..


 
WCL च्या दुसऱ्या हंगामातील भारत-पाक यांच्यातील सामना रद्द झाल्यावर अजय देवगणचा एक फोटो व्हायरल होताना दिसतोय. ज्यात तो पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसत आहे. मैदानातील हा फोटो या हंगामातील असा समज झाल्यामुळे काहीजण सोशल मीडियावर अजय देवगणला ट्रोल करत आहेत. पण हा फोटो या हंगामातील नाही. 

फोटोमागचं सत्य अन् अजय देवगणचा या लीगशी असणारा संबंध

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूंच्या सहभागासह २०२४ पासून वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स या नावाने ही स्पर्धा खेळवण्यात येते. हर्षित तोमर हे WCL या टी २० लीगचे संस्थापक असून बॉलिवड अभिनेत्याची या लीगमध्ये गुंतवणूक आहे. तो या लीगचा सह मालकही आहे. जो फोटो व्हायरल होत आहे तो यंदाच्या हंगामातूनल नसून तो  गत हंगामातील आहे. WCL च्या पहिल्या वहिल्या हंगामात भारत-पाक यांच्यात फायनल झाली होती. एवढेच नाही तर भारतीय संघाने ही स्पर्धा जिंकली होती. जो फोटो व्हायरल होत आहे तो त्या वेळीचा आहे.

Web Title: World Championship of Legends 2025 IND vs PAK Truth Behind Ajay Devgn's Meeting With Shahid Afridi In England As Pictures Go Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.