Join us

महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक

कोलंबो : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानविरुद्ध हातातून गेलेला सामना खेचून आणत १०७ धावांनी दणदणीत विजय ...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2025 05:34 IST

Open in App

कोलंबो : गतविजेत्या ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बुधवारी पाकिस्तानविरुद्ध हातातून गेलेला सामना खेचून आणत १०७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. प्रथम फलंदाजीची संधी मिळाल्यानंतर ५० षटकांत ९ बाद २२१ धावा केलेल्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३६.३ षटकांत ११४ धावांत गुंडाळले. 

बेथ मूनीने निर्णायक शतक झळकावत ऑस्ट्रेलियाला विजयी केले.  पाकिस्तानकडून केवळ सिदरा आमिन हिने एकाकी झुंज देताना ५२ चेंडूंत ५ चौकारांसह ३५ धावा केल्या. इतर सर्व प्रमुख फलंदाज सपशेल अपयशी ठरले. किम गार्थ ३, तर मेगन शट व ॲनाबेल सदरलँड यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

त्याआधी, मुनीने ऑस्ट्रेलियाला ७ बाद ७६ अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून सावरले. मुनीने ११४ चेंडूंत ११ चौकारांसह १०९ धावा केल्या. मुनीने किम गार्थसोबत आठव्या बळीसाठी ७५ चेंडूंत ३९ धावांची भागीदारी केल्यानंतर ॲलना किंगसोबत नवव्या बळीसाठी ९७ चेंडूंत १०६ धावांची निर्णायक शतकी भागीदारी केली. ॲलनाने ४९ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह नाबाद ५१ धावांचा तडाखा दिला. मुनी ४३ धावांवर असताना २८व्या षटकांत फातिमा सनाने तिला धावबाद करण्याची नामी संधी गमावली. या संधीचा फायदा घेत मुनीने विश्वचषक स्पर्धेतील आपले पहिले शतक झळकावले. मुनी-ॲलना यांनी महिला विश्वचषक स्पर्धेतील नवव्या बळीसाठी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. तसेच, दहा किंवा त्याखालच्या क्रमांकावर अर्धशतक झळकावणारी ॲलना ही महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिली फलंदाजही ठरली.

  संक्षिप्त धावफलक ऑस्ट्रेलिया : ५० षटकांत ९ बाद २२१ धावा (बेथ मुनी १०९, ॲलना किंग नाबाद ५१; नाशरा संधू ३/३७, रामीन शमिम २/२९, फातिमा सना २/४९.) वि. वि. पाकिस्तान : ३६.३ षटकांत सर्वबाद ११४ धावा (सिदरा आमिन ३५, रामीन शमिम १५; किम गार्थ ३/१४, ॲनाबेल सदरलँड २/१५, मेगन शट २/२५.)

English
हिंदी सारांश
Web Title : Australia Defeats Pakistan in Women's World Cup, Mooney's Century Wins

Web Summary : Beth Mooney's century propelled Australia to a 107-run victory over Pakistan in the Women's World Cup. Overcoming a shaky start, Mooney's ton, supported by Alana King's fifty, secured the win after Pakistan faltered against Australia's bowling attack.
टॅग्स :आयसीसी महिला विश्वचषक २०२५पाकिस्तान