Join us  

सात वर्षानंतर महिला संघाचे कसोटीत पुनरागमन; भारताचा इंग्लंडविरुद्ध एकमेव सामना आजपासून

भारत आणि ब्रिटनमध्ये क्वारंटाईन झाल्यानंतर मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला तयारीसाठी सात दिवसांचा वेळ मिळाला. मिताली, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांना कसोटीचा अनुभव आहे पण युवा खेळाडू या प्रकारात कशी कामगिरी करतील,याकडे लक्ष असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 5:35 AM

Open in App

ब्रिस्टल : तयारीसाठी पुरेसा वेळ मिळाला नसला तरी इंग्लंडमधील चांगला रेकॉर्ड आणि सकारात्मक मानसिकतेच्या बळावर भारतीय महिला संघ बुधवारपासून यजमान इंग्लंडविरुद्ध चार दिवसांचा एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. भारतीय संघ कसोटीत सात वर्षानंतर पदार्पण करीत आहे,हे विशेष. नोव्हेंबर २०१४ ला भारताने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्या सामन्यात द. आफ्रिकेवर विजय नोंदविला होता.

भारत आणि ब्रिटनमध्ये क्वारंटाईन झाल्यानंतर मिताली राजच्या नेतृत्वाखालील संघाला तयारीसाठी सात दिवसांचा वेळ मिळाला. मिताली, झुलन गोस्वामी, हरमनप्रीत कौर, स्मृती मानधना यांना कसोटीचा अनुभव आहे पण युवा खेळाडू या प्रकारात कशी कामगिरी करतील,याकडे लक्ष असेल.भारतीय संघाने केवळ नेट्‌समध्ये सराव केला. खेळाडू फॉर्ममध्ये आहेत, फिट आहेत, मात्र सरावाला पर्याय नाही. सामना कितीही दिवसांचा असला तरी त्याआधी सराव आवश्यक असल्याचे मत बीसीसीआय सूत्रांनी व्यक्त केले.

भारतीय संघाला पुरुष संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे याने दिलेल्या टिप्स फारच उपयुक्त करणार आहेत. १७ वर्षांची शेफाली वर्मा स्मृती मानधनासोबत सलामीला खेळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनुभवी मिताली, हरमन आणि पुनम राऊत यांच्यावर धावा काढण्याची जबाबदारी असेल. झुलन आणि शिखा पांडे गोलंदाजीत किती लांब स्पेल करू शकतील, हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारताने इंग्लंडमध्ये आठपैकी आठ सामने जिंकले आहेत.

‘कसोटीत दीर्घकाळ फलंदाजी कशी करायची याबाबत अजिंक्य रहाणेने मोलाच्या टिप्स दिल्या. रहाणेसारख्या अनुभवी खेळाडूसोबत फार सहजपणे, मैत्रीपूर्ण संवाद साधता आला. या मार्गदर्शनाचा लाभ इंग्लंडविरुद्ध खेळताना चार दिवस निश्चितपणे होणार आहे.’- हरमनप्रीत कौर‘भारताविरुद्ध कसोटी खेळणे विशेष असेल. महिला क्रिकेटमध्ये कसोटी प्रकार कमी खेळला जातो, मात्र आम्ही भारतीय संघाविरुद्ध संपूर्ण ताकदीनिशी खेळून एकमेव कसोटी जिंकण्याच्या इराद्याने खेळू. त्यासाठी सर्व सहकारी सज्ज आहेत.’- केट क्रॉस, गोलंदाज, इंग्लंड.

उभय असे यातून निवडणारभारत : मिताली राज (कर्णधार),स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, प्रिया पुनिया, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, शेफाली वर्मा, स्नेह राणा, तानिया भाटिया, इंद्राणी रॉय, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्रकार, अरुंधती रेड्डी, पूनम यादव, एकता बिश्त आणि राधा यादव.इंग्लंड : हीथर नाईट (कर्णधार), एमिली अर्लोट, टॅमी ब्यूमोंट, कॅथरीन ब्रंट, केट क्रॉस, फ्रेया डेविस, सोफिया डंकली, सोफी एक्सेलेटन, जॉर्जिया एल्विस, टॅश फरांट, सारा ग्लेन, एमी जोन्स, नेट स्किवेर, आन्या श्रुबसोले, मॅडी विलियर्स, फ्रान विल्सन आणि लॉरेन विनफील्ड हिल

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघ