Join us

महिलांच्या मिनी IPL स्पर्धेला मुहूर्त सापडला, जाणून घ्या वेळापत्रक

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2019 13:52 IST

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. सुपरनोव्हाज, ट्रेलब्लेझर्स आणि व्हेलॉसिटी अशी तीन सहभागी संघांची नावं आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे सामने खेळवण्यात येतील आणि त्यात भारत व जगातील अव्वल महिला क्रिकेटपटू सहभाग घेणार आहेत. हे तीनही संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील आणि अव्वल दोन संघ अंतिम फेरीत भिडणार आहेत. 

 

गतवर्षी आयपीएलमध्ये दोन संघांमध्ये महिलांची आयपीएल स्पर्धा खेळवण्यात आली होती. त्यात स्मृती मानधनाचा ट्रेलब्लेझर्स आणि हरमनप्रीत कोरचा सुपरनोव्हाज संघ यांच्यात सामने झाले होते. या प्रदर्शनीय सामन्यात एलिस पेरी, मेग लॅनिंग, एलिसा हिली, बेथ मूनी, सूजी बॅट्स आणि सोफी डेव्हीयन या दिग्गज महिला खेळाडूंचा समावेश होता. गतवर्षी प्रमाणे या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. पण, स्टेडियमवरील प्रेक्षकांची उपस्थिती तुरळक होती. गतवर्षी महिलांचा क्रिकेट सामना दुपारी दोन वाजता खेळवण्यात आला होता.   

असे असेल वेळापत्रक6 मे - सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स8 मे - ट्रेलब्लेझर्स वि. व्हॅलोसिटी9 मे - सुपरनोव्हाज वि. व्हॅलोसिटी 11 मे - अंतिम सामना  

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल 2019