Join us

महिला क्रिकेटपटूचा विनयभंग, कोच निलंबित

Woman cricketer molested: महिला क्रिकेटपटूचा विनयभंग केल्याच्या आरोपात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  राष्ट्रीय स्तरावरील एका कोचला निलंबित केले आहे.  नदीम इक्बाल असे निलंबित कोचचे नाव असून, ते मुलतानचे कोच आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2022 05:50 IST

Open in App

कराची - महिला क्रिकेटपटूचा विनयभंग केल्याच्या आरोपात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  राष्ट्रीय स्तरावरील एका कोचला निलंबित केले आहे.  नदीम इक्बाल असे निलंबित कोचचे नाव असून, ते मुलतानचे कोच आहेत. वकार युनूस खेळत असलेल्या प्रथमश्रेणी संघात नदीम हेदेखील वेगवान गोलंदाज होते.या प्रकरणाचा तपास सुरू झाला असून, नदीम यांनी सेवाशर्तींचा भंग केला का, हे तपासण्यात येत आहे. पोलीस तक्रारीत क्रिकेटपटूने दावा केला की, मुलतानला चाचणीसाठी गेली असता, नदीम यांनी संघात निवडीचे आणि बोर्डात नोकरी मिळवून देण्याचे प्रलोभन दिले. त्यांनी माझे शारीरिक शोषण केले. त्यात नदीम यांच्या काही मित्रांचाही समावेश होता. सर्वांनी माझा व्हिडीओ बनवून अनेकदा ब्लॅकमेल केले.

टॅग्स :पाकिस्तानमहिला
Open in App