"बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण..." रिंकू सिंह वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

रिंकूसाठी खंबीर आधारस्तंभ होते त्याचे बाबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:46 IST2026-03-10T14:39:17+5:302026-03-10T14:46:49+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Wish you were here: Rinku Singh's emotional note for father after T20 World Cup win | "बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण..." रिंकू सिंह वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

"बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण..." रिंकू सिंह वडिलांच्या आठवणीत झाला भावूक

Rinku Singh's Emotional Note For Father After T20 World Cup Win : टीम इंडियाचा फिनिशर रिंकू सिंह याने (Rinku Singh) याने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आपल्या दिवंगत वडिलांसाठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रिंकू सिंह याचे वडील खानचंद्र सिंह यांचे २७ फेब्रुवारीला स्टेज-४ लिव्हर कॅन्सरने निधन झाले. दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतरही रिंकू मैदानात उतरला अन् त्याने आपल्या बाबांचे स्वप्न साकार केले. बाबा या आनंदाच्या क्षणी तुम्ही  माझ्यासोबत असायला हवे होते, अशा आशयाच्या शब्दांत रिंकूनं आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

"बाबा तुमचं स्वप्न मी पूर्ण केलं, पण..." रिंकू सिंहची भावूक पोस्ट


रिंकू सिंह याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने लिहिलं आहे की, "तुमच्याशी बोलल्याशिवाय इतके दिवस कधीच गेले नव्हते. तुमच्याशिवाय आयुष्य कसं पुढे जाईल हे मला माहीत नाही, पण प्रत्येक पावलावर तुमची आठवण येईल. तुम्ही नेहमी सांगायचा की, कर्तव्य सर्वात आधी येतं. त्यामुळेच तुमचे  स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे. या क्षणी तुम्ही माझ्यासोबत असायला हवे होते. प्रत्येक छोट्या-मोठ्या आनंदात तुमची उणीव भासेल. बाबा, तुम्हाला खूप मिस करेन."

आयसीसीच्या सहापट! BCCI कडून विश्वविजेत्या संघाला १३१ कोटींचे बक्षीस जाहीर; कोणाला किती मिळणार? जाणून घ्या

रिंकूचा आधारस्तंभ होते बाबा
 
वर्ल्ड कपदरम्यान वडिलांच्या निधनाची बातमी मिळाली त्यावेळी रिंकू संघासोबत चेन्नई येथे होता. ही बातमी मिळताच तो लगेच मूळ गावी परतला. वडिलांवरील अंत्यसंस्कारानंत तो पुन्हा संघात जॉईन झाल्याचे पाहायला मिळाले होते. रिंकू सिंहच्या यशात त्याच्या वडिलांचा खूप मोठा वाटा आहे. घरची परिस्थितीत हलाकीची असताना गॅस सिलेंडरचं ओझे खांद्यावरून वाहून नेत त्यांनी लेकाला क्रिकेटर बनवलं. टीम इंडियाची जर्सीत लेकानं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न त्यांनी पाहिले. ते स्वप्न सत्यात उतरल्यावर आज ते रिंकूसोबत नाहीत. २०२४ च्या हंगामात रिंकू सिंह ट्रॅव्हलिंग रिझर्व खेळाडूच्या रुपात संघासोबत होता. यावेळी त्याने पाच सामने खेळले. फलंदाजीत तो चमकला नसला तरी  क्षेत्ररक्षणात सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. 
 

Web Title : रिंकू सिंह ने वर्ल्ड कप जीत पिता के सपने को समर्पित की।

Web Summary : टी20 वर्ल्ड कप जीतने के बाद रिंकू सिंह ने भावुक होकर जीत अपने दिवंगत पिता को समर्पित की, जिनका कैंसर से निधन हो गया था। उन्होंने व्यक्तिगत क्षति के बावजूद अपने पिता का सपना पूरा किया और उनकी अनुपस्थिति से होने वाले गहरे खालीपन को व्यक्त किया।

Web Title : Rinku Singh dedicates World Cup win to late father's dream.

Web Summary : Rinku Singh, after winning the T20 World Cup, emotionally dedicated the victory to his late father, who passed away from cancer. He fulfilled his father's dream despite the personal loss and expressed the deep void his father's absence creates.