Join us

भारतात जा, वर्ल्ड कप जिंका; BCCI साठी ही मोठी चपराक असेल - शाहिद आफ्रिदी बरळला

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या राजकीय संबंधांमुळे द्विदेशीय क्रिकेट मालिका बंद झाल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2023 17:42 IST

Open in App

भारत-पाकिस्तान यांच्यातल्या राजकीय संबंधांमुळे द्विदेशीय क्रिकेट मालिका बंद झाल्या आहेत. आशिया चषक २०२३ स्पर्धेचं यजमानपद पाकिस्तानला मिळाल्यामुळे BCCI ने संघाला तेथे पाठवण्यास नकार दिला. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ( PCB) भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप २०२३ स्पर्धेवर बहिष्काराची भाषा केली. पण, BCCIची क्रिकेट विश्वातील मक्तेदारी पाहून PCBला माघार घ्यावी लागली आणि ते भारतात वर्ल्ड कप खेळायला येणार आहेत. अशात पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Former Pakistan captain, Shahid Afridi) बरळला आहे. भारतात जाऊन वर्ल्ड कप जिंकणे, यापेक्षा BCCIच्या नाचक्कीचा क्षण नसेल, असे तो म्हणाला आहे.

माजी अष्टपैलू खेळाडूने पुन्हा सांगितले की व्यवस्थापनाने त्यांच्या राष्ट्रीय खेळाडूंना जाण्यासाठी, वर्ल्ड कप खेळण्यासाठी आणि ट्रॉफी जिंकून परत येण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. हा सगळा खटाटोप सकारात्मक आणि हुशारीने सोडवला गेला पाहिजे. "मला समजत नाही की ते [PCB] इतके ठाम का आहेत आणि आम्ही भारतात जाणार नाही असे का म्हणत राहतात. त्यांना परिस्थिती सुलभ करणे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा होत आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्याकडे  सकारात्मकपणे पाहा. जा आणि खेळा. तुमच्या मुलांना ट्रॉफी मिळवायला सांगा, संपूर्ण देश तुमच्या पाठीशी उभा आहे. हा फक्त आमच्यासाठी मोठा विजय नाही,तर बीसीसीआयच्या तोंडावर एक कडक चपराक असेल,” आफ्रिदी म्हणाला.

४६ वर्षीय आफ्रिदीने सांगितले की, आपल्याकडे पर्याय नाही आहेत आमि त्यामुळे भारतात जा, चांगलं खेळा आणि विजय मिळवा. हाच आमच्याकडे एकमेव पर्याय आहे. आपल्याला तिथे जायचे आहे, वर्ल्ड कपसह परत यायचे आहे आणि त्यांना स्पष्ट संदेश द्यायचा आहे,की कुठेही जाऊन विजय मिळवू शकतो.    

टॅग्स :शाहिद अफ्रिदीवन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App