विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत

आता कोहली लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या वृत्तांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2024 07:58 IST2024-07-20T07:55:52+5:302024-07-20T07:58:01+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Will Virat Kohli move to London? | विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत

विराट कोहली लंडनला स्थायिक होणार? कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत

लंडन : भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलांसोबत लंडनमध्ये वास्तव्यास आहे. गुरुवारी रात्री श्रीलंका दौऱ्यासाठी जाहीर झालेल्या भारताच्या एकदिवसीय संघात त्याची निवडही झाली आहे. मात्र, आता कोहली लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याच्या वृत्तांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

विराट कुटुंबासह लंडनमध्ये फिरतानाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यात तो अकाय आणि वामिकासोबत दिसत आहे. अकायसोबत स्पष्टपणे दिसत असल्याचा कोहलीचा हा पहिलाच प्रसंग होता. हा व्हिडीओ फार दूरवरून रेकॉर्ड करण्यात आल्याचे जाणवते. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कोहली लंडनमध्ये स्थानिक होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. त्यात आता हा लंडनमधीलच कोहलीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा एकदा विराट-अनुष्का लंडनमध्ये स्थायिक होणार असल्याचे म्हटले जात आहे. तरी अद्याप सोशल मीडियावरील या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

 

Web Title: Will Virat Kohli move to London?