Join us

'दहा वर्षांत तुझी जागा घेईन'; कोहलीला भर स्टेडियममध्येच खुलं आव्हान

भारतीय कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये बंगळुरु संघाचे नेतृत्व करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 12:37 IST

Open in App

नवी दिल्ली - सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. यामध्ये विराट कोहलीच्या एका फॅनने त्याला मजेदार आव्हान दिलं आहे. यामध्ये विराटला 10 वर्षात रिप्लेस करण्याच आव्हान त्या  फॅनने दिलं. पंजाब आणि बंगळुरुच्या सामन्यादरम्यानाचा हा फोटो आहे. दहा वर्षाच्या लहान मुलाच्या हातात एक पोस्टर आहे. त्या पोस्टरवर   'हैलो विराट सर, अगले 10 साल में आपको रिप्‍लेस करने का वादा करता हूं, बेस्‍ट ऑफ लक.'  असे लिहण्यात आले आहे.  सोशल मीडियावर या फोटोवर प्रतिक्रिया येत आहेत. यामध्ये एका नेटीझन्सने या फोटोला एेतिहासिक म्हटले आहे. एक नेटिझन्सने असे म्हटले आहे की, जर हा मुलगा भारतीय संघात खेळला तर हा क्षण त्याच्यासाठी ऐतिहासिक राहिल. 

भारतीय कर्णधार विराट कोहली आयपीएलच्या 11 व्या सत्रामध्ये बंगळुरु संघाचे नेतृत्व करत आहे. सध्या बंगळुरु संघाची कामगिरी समाधानकारक होत असल्याची दिसत नाही. विराट कोहली सोडता इतर खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. बंगळुरु संघ सध्या सातव्या स्थानावर आहे. संघाला पहिल्यांदाच विजेतेपद मिळवून देण्याचा विराट प्रयत्न करत आहे. 2013 पासून कोहली बंगळुरु संघाचा कर्णधार आहे. कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरु संघाने 2016 मध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती.  या सत्रात कोहलीने चार शतकांसह 943 धावा केल्या होत्या. 

11 व्या सत्रात सध्या बंगळुरु संघाची कामगिरी निराशजन आहे. पहिल्या सामन्यात कोलकाताकडून चार विकेटने पराभव पत्कारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात पंजबाचा पराभव केला होता. तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यात राजस्थान आणि मुंबईने पराभव केला आहे.  21 तारखेला बंगळुरुचा सामना नवी दिल्लीशी होणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीआयपीएल 2018रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर