रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश

लिसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात रोहित पहिल्या दिवशी खेळला. मात्र, त्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 10:30 AM2022-06-28T10:30:45+5:302022-06-28T10:31:01+5:30

whatsapp join usJoin us
Will Rohit be out of Tests Mayank Agarwal included in the team | रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश

रोहित कसोटीतून बाहेर होणार? या क्रिकेटरचा संघात समावेश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल याला कर्णधार रोहित शर्माचा कव्हर (बदली खेळाडू) म्हणून इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एजबस्टन कसोटीसाठी भारतीय संघात घेण्यात आले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे रोहितचे या कसोटीत खेळणे अनिश्चित वाटत आहे.

लिसेस्टरशायरविरुद्ध अनिर्णीत राहिलेल्या सराव सामन्यात रोहित पहिल्या दिवशी खेळला. मात्र, त्यानंतर तो क्वारंटाइन झाला होता. रॅपिड अँटिजन चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मयंकला याआधी १ जुलैपासून सुरू होत असलेल्या १५ सदस्यांच्या कसोटी संघात सुरुवातीला स्थान मिळाले नव्हते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेआधी लोकेश राहुल जखमी झाल्याने आणि आता रोहित कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर मयंकला संघात स्थान देण्यात आले.

क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, सलामीवीर अग्रवालला एजबस्टन कसोटी सामन्यासाठी पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, अग्रवालला क्वारंटाइन राहावे लागणार नाही. गरज भासल्यास तो अंतिम एकादशमध्ये सहभागी होऊ शकतो. रोहित सध्या हॉटेलमध्ये क्वारंटाइन आहे. मालिकेच्या निर्णायक सामन्यात भारताचे नेतृत्व कोण करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. भारत या मालिकेत सध्या २-१ ने आघाडीवर आहे. मयंकने २१ कसोटींत ४१.३३ च्या सरासरीने १४८८ धावा केल्या. मार्च महिन्यात श्रीलंकेविरुद्ध तो अखेरची कसोटी खेळला होता.

Web Title: Will Rohit be out of Tests Mayank Agarwal included in the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.