आरसीबी-केकेआर लय कायम राखणार?

दोन्ही संघांपुढे आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही समस्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 12:35 IST2024-03-29T12:35:21+5:302024-03-29T12:35:27+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Will RCB-KKR continue the rhythm? | आरसीबी-केकेआर लय कायम राखणार?

आरसीबी-केकेआर लय कायम राखणार?

बंगळुरू : विजयामुळे आत्मविश्वास बळावला; पण परिपूर्ण कामगिरी शिल्लक असताना रॉयल चॅलेंसर्ज बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल २०२४ मध्ये शुक्रवारी विजयी लय कायम राखण्याच्या निर्धाराने खेळताना दिसतील. आरसीबीने पंजाब किंग्सचा चार गड्यांनी तर केकेआरने हैदराबादचा चार धावांनी पराभव केला होता. दोन्ही संघांपुढे आघाडीच्या आणि मधल्या फळीतील फलंदाजांचे अपयश ही समस्या आहे.

आरसीबी
कर्णधार फाफ डु प्लेसीस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, रजत पाटीदार यांच्याकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा. दिनेश कार्तिकचा अनुभव आणि इम्पॅक्ट प्लेअर महिपाल लोमरोर हे धावा काढत आहेत.
वेगवान मोहम्मद सिराज, यश दयाल, अल्झारी जोसेफ यांच्यासह इंग्लंडचा डावखुुरा वेगवान गोलंदाज रीसे टॉपले यांच्यावर शिस्तबद्ध माऱ्याची जबाबदारी असेल. 

केकेआर
कर्णधार श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, सुनील नारायण, नितीश राणा यांना धावा काढाव्या लागतील. रमणदीपसिंग, रिंकूसिंग आणि अष्टपैलू आंद्रे रसेल यांच्यावर डेथ ओव्हरमध्ये कामगिरी सुधारण्याची जबाबदारी असेल.
केकेआरची गोलंदाजी भेदक आहे. मिचेल स्टार्क, आंद्रे रसेल, सुनील नारायण, फिल सॉल्ट, हर्षित राणा, यांच्या बळावर आरसीबीच्या फलंदाजांना रोखण्याचे काम होईल.

सामना : सायंकाळी ७.३० पासून

Web Title: Will RCB-KKR continue the rhythm?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.