विल पुकोव्हस्की (Will Pucovski) आणि मार्कस हॅरीस (Marcus Harris ) ही दोन नावं आतापर्यंत कदाचीत कोणी एकलीही नसतील. पण, सध्या या दोघांचीच चर्चा आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्य शेफिल्ड शिल्ड ( Sheffield Shield) क्रिकेट स्पर्धेत या दोघांनी पराक्रमच असा केला आहे, की जगभरात त्यांची चर्चा सुरू झाली आहे. व्हिक्टोरिया क्रिकेट क्लबकडून खेळणाऱ्या या सलामीवीरांनी ९४ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना सर्वांना अवाक् करणारी कामगिरी केली. साऊथ ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २०० धावांवर गुंडाळल्यानंतर व्हिक्टोरियाचे हे फलंदाज मैदानावर उतरले ते भीमपराक्रम करण्याच्या निर्धारानेच.
पुकोव्हस्की आणि हॅरीस यांनी दुसऱ्या दिवसअखेर पहिल्या विकेटसाठी नाबाद ४१८ धावांची भागीदारी केली आहे. व्हिक्टोरिया क्रिकेट क्लबसाठी कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोत्तम भागीदारी आहे. या जोडीनं ३७६ धावांची वेस ओलांडताच १९२६ सालचा विक्रम मोडला. व्हिक्टोरिया क्रिकेट क्लबकडून पहिल्या विकेटसाठी १९२६मध्ये वूडफुल/पोन्सफोर्ड यांनी न्यू साऊथ वेल्सविरुद्ध ३७५ धावा चोपल्या होत्या. पुकोव्हस्की व हॅरीस यांनी हा विक्रम मोडला. त्यांचा झंझावात येथेच थांबला नाही. त्यांनी आतापर्यंत ४१८ धावांची भागीदारी केली आहे.
पुकोव्हास्की ३०८ चेंडूंत २२ चौकार १ षटकारासह १९९ धावांवर, तर हॅरीस ३५९ चेंडूंत २४ चौकार व १ षटकारासह २०७ धावांवर खेळत आहेत.
ऑस्ट्रेलियाच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या विकेटसाठी केलेली ही चौथी सर्वोत्तम भागीदारी आहे.
५०३ - आरजीएल कार्टर्स/ एजे फिंच CA XI वि. NZ Sydney 2015
४५६ - इआर मायने/डब्लूएच पोन्सफोर्ड Vic v Qld Melbourne 1923
४३१- एमआरजे व्हेलेट्टा/जीआर मार्स WA v SAus Perth 1989