मुंबई-हैदराबादचे संघ प्ले ऑफमधील यशाची पुनरावृत्ती करतील का? 

आयपीएल 2020 आता अंतिम पर्वात आहे आणि पहिल्या चार स्थानांवर अनुक्रमे मुंबई इंडियन्स (MI) , दिल्ली कॅपिटल्स (DC), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(RCB) हे संघ आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2020 12:13 PM2020-11-04T12:13:43+5:302020-11-04T12:14:24+5:30

whatsapp join usJoin us
Will Mumbai-Hyderabad repeat their success in the playoffs | मुंबई-हैदराबादचे संघ प्ले ऑफमधील यशाची पुनरावृत्ती करतील का? 

मुंबई-हैदराबादचे संघ प्ले ऑफमधील यशाची पुनरावृत्ती करतील का? 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ललित झांबरे

आयपीएल 2020 आता अंतिम पर्वात आहे आणि पहिल्या चार स्थानांवर अनुक्रमे मुंबई इंडियन्स (MI) , दिल्ली कॅपिटल्स (DC), सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर(RCB) हे संघ आहेत. आयपीएलमध्ये 2011 पासून पहिल्या चार संघांमध्ये क्वालीफायर (Qualifier) आणि एलिमिनेटर (Elliminator) असे सामने खेळले जातात.   क्वालिफायर सामना पहिल्या दोन स्थानाच्या संघात होतो आणि एलिमिनेटर म्हणजे तिसऱ्या व चौथ्या संघात सामना होतो. क्वालिफायरचा पराभूत व एलिमिनेटरचा विजेता यांच्यात क्वालिफायर दुसरा सामना होतो. क्वालिफायर एकचा विजेता आणि क्वालिफायर दोनचा विजेता यांच्यात अंतिम सामना खेळला जातो. 

या सुत्रानुसार गेल्या नऊ वर्षांपासून आयपीएलचा शेवटचा टप्पा खेळला जातोय. या नऊ वर्षात केवळ 2012 व 2016चा अपवाद वगळला तर पहिल्या क्वालिफायर सामन्याच्या संघांतच म्हणजे साखळीत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या संघातच अंतिम सामना झाला आहे. 2012 व 2016 मध्ये मात्र एलिमिनेटर विजेत्या संघाने (चेन्नई व हैदराबाद) अंतिम फेरी गाठली होती आणि सनरायझर्स हैदराबाद संघाने 2016 मध्ये विजेतेपद पटकावून इतिहास घडवला होता. त्यावर्षी ते साखळीअखेर तिसऱ्या स्थानी होते आणि एलिमिनेटर असून विजेतेपद पटकावणारा सनरायझर्स हैदराबाद हा एकमेव संघ आहे.

आता यंदा पुन्हा सनरायजर्सचा संघ साखळीअंती तिसऱ्या स्थानी असून त्यांना एलिमिनेटर सामना खेळायचा आहे. त्यामुळे ते 2016ची पुनरावृत्ती करणार का, याची उत्सुकता आहे. 2012मध्ये सीएसकेचा संघ एलिमिनेटर सामना जिंकून अंतिम फेरीत पोहोचला होता पण कोलकाता नाईट रायडर्सने त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानायला लावले होते.  

मुंबई इंडियन्स हा क्वालिफायर पहिला सामना हरल्यावर आणि क्वालिफायर सामना जिंकल्यावर अशा दोन्ही प्रकारे विजेतेपद पटकावणारा एकमेव संघ आहे. 2013 व 2017 मध्ये मुंबईचा संघ क्वालिफायरमध्ये अनुक्रमे सीएसके व रायझिंग पूणेकडून हरला होता पण क्वालिफायर दोन जिंकल्यानंतर त्यांनी अंतिम सामन्यात याच सीएसके व रायझिंग पुणे संघांना पराभूत केले होते. 2015 व 2019 मध्ये पहिला क्वालिफायर सामना जिंकून ते विजेते ठरले होते. आता पुन्हा त्यांना क्वालिफायर सामना खेळायचा आहे. तर मुंबईचा संघ 2015 व 19 ची पुनरावृत्ती करेल का, याची आता उत्सुकता आहे. 

Web Title: Will Mumbai-Hyderabad repeat their success in the playoffs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.