Join us

विरुष्काच्या वैवाहिक जीवनासाठी पुढची दोन वर्षे कठीण?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा काल विवाहबंधनात अडकले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2017 14:17 IST

Open in App

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा अखेर काल विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कुटुंबीय इटलीला रवाना झाले होते. यावरून दोघेही लवकरच विवाह करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. तसेच इटलीच्या मिलानमधील एक आलिशान हॉटेलही 9 ते 12 डिसेंबरदरम्यान आरक्षित करण्यात आले होते. अखेर दोघेही सात फेरे घेत लग्नबेडीत अडकले.

विरुष्काच्या लग्नाबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता असली तरी ज्योतिषांनी मात्र एक वेगळीच भविष्यवाणी केली आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, या लग्नामुळे विराट आणि अनुष्का यांच्या आयुष्यात आनंदच येईल. पण दोघंही आपले खासगी आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल राखू नाही शकले तर दोघांमध्ये मतभेद होऊ शकतात. टाइम्स नाऊच्या वृत्तानुसार, ज्योतिष मालव भट्ट यांनी सांगितले की, दोघांमध्ये भावनिक मतभेदांची शक्यता आहे. या मतभेदांमुळेच मानसिक अशांती राहू शकते. त्यामुळेच येणारी दोन वर्षे दोघांसाठीही फार महत्त्वपूर्ण आहेत.

काल रात्री 9 वाजण्याच्या सुमाराला दोघांतर्फे अधिकृतपणे त्यांच्या विवाहाबाबतची घोषणा करण्यात आली. या विवाहसोहळ्यासाठी काही निमंत्रितांनाच बोलावण्यात आले होते. यामुळे ‘विरुष्का’चे चाहते नाराज झाले होते. दोघांच्या लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत 21 तारखेला होणार असून अनुष्का आणि विराटच्या मित्र मैत्रिणीसाठी 26 तारखेला मुंबईत रिसेप्शन आयोजित करण्यात आले आहे. 

ट्विट करत विरुष्काने दिली लग्नाची माहिती - 'आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' असं ट्विट दोघांनी केलं आहे'  

क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा‘विरूष्का’ने ट्विटरवरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिल्यानंतर अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, अभिषेक बच्चन, शाहिद आफ्रिदी, चेतेश्वर पुजारा, शोयब अख्तर यांच्यासह अनेक बॉलिवूड आणि क्रिकेटपटू  सेलिब्रिटींचा समावेश आहे. 

टॅग्स :विरूष्का वेडिंगविराट अनुष्का लग्नविराट कोहलीअनुष्का शर्मा